शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 00:27 IST

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यास पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.

अहमदनगर : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यास पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण जिल्ह्याच्या दौºयावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली़ ते म्हणाले, मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करु, असे सांगत आहेत. अजून यांचे पाहणी दौरे व्हायचे आहेत. पडलेला पाऊस, धरणातील पाणीसाठे व उपलब्ध चारा याचे अहवाल असताना सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे? कापसावर बोंडअळी व उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. शेतकºयांना विजेचे रोहित्र मिळत नाहीत़ भारनियमन सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. जनता आता सरकारचाच ‘लोड’ कमी करण्याच्या विचारात आहे. यंत्रणेचा दुरुपयोग करुन सरकार व्यापाºयांवर छापे टाकत आहे. गुजरात निवडणुकांपूर्वीही व्यापाºयांना अशीच भीती दाखविण्यात आली. शेअर बाजार कोसळला, रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे सर्वच जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व सरचिटणीस विनायक देशमुख यावेळी त्यांच्यासमवेत होते.निवडणुका आल्या की सेनेला राम आठवतोराम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने काढला याचा अर्थच असा की निवडणुका आल्या आहेत. निवडणूक आली की सेनेला हा मुद्दा आठवतो. भाजप-सेना एकच आहेत. ते भांडणाचा फार्स करतात. सनातन संस्था दहशती कृत्य करत आहे हे उघड झाले आहे. नव्याने समोर आलेल्या स्टिंगमधूनही ते दिसते. परंतु भाजप सरकार या संघटनेबाबत नरम धोरण घेत आहे. संजय राऊत ‘सनातन’च्या कार्यक्रमाला जाणार आहेत कारण सेनाही त्यांना पाठिशी घालते, असे चव्हाण म्हणाले.राष्टÑवादीसोबत १२ रोजी मतदारसंघनिहाय चर्चाराष्ट्रवादीने लोकसभेचे काही मतदारसंघ मागितले आहेत याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, मतदारसंघ निहाय काँग्रेसची येत्या ११ तारखेला बैठक आहे. त्यानंतर राष्टÑवादीसोबत १२ आॅक्टोबरला बैठक होईल. राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे राष्टÑवादीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ मागत आहेत. याबाबत राष्टÑवादीसोबत अजून औपचारिक चर्चा झाली नाही. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबतही बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण