शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रिफायनरीसाठी समुद्राची गरज नाही, जगातील ३२ रिफायनरीज असलेल्या देशात समुद्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:24 IST

‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते.

- सोपान पांढरीपांडे  नागपूर  - ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते. आजमितीला जगात ६८० रिफायनरीज सुरू आहेत. त्यापैकी ३२ रिफायनरीज असलेल्या १५ देशांमध्ये समुद्र किनारा नाही.पेट्रोलियम रिफायनरीमध्ये क्रूड आॅईलचे बाष्पीभवन करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, विमानाचे इंधन, रॉकेल, पेट-कोक व पेट्रोकेमिकल्स अशी १४३ उत्पादने प्राप्त केली जातात. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत भरपूर पाणी आवश्यक असते, म्हणून रिफायनरी समुद्र किनाऱ्यालगत असावी, असे ब्रिटिश काळात रूढ होते.याशिवाय त्यावेळी क्रूड आॅईलची वाहतूक फक्त समुद्री जहाजातून होत असल्यामुळेही रिफायनरी समुद्र किनाºयालगत टाकल्या जात होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच गृहितकाचा आधार घेऊन ‘‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’’ हे विधान केल्याचे स्पष्ट होते. परंतु तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे. आधुनिक रिफायनरीमध्ये पाणी कमी लागते. यामुळे हल्ली रिफायनरीकडे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून बघितले जाते व त्या समुद्र किनाºयापासून दूर असलेल्या मागास भागात टाकल्या जातात. ज्या देशांजवळ समुद्र किनारा आहे, अशा काही देशांमध्येही पेट्रोलियम रिफायनरी समुद्रापासून दूरच्या भागात उभारल्या गेल्याची उदाहरणे पहायला मिळतात. काळाच्या ओघात क्रूड आॅईलची वाहतूक पाइपलाइनद्वारे होऊ लागली आहे व त्यात पैशाची प्रचंड बचत होत आहे. कारण रेल्वेने क्रूड आॅईलचा वाहतूक खर्च लिटरला ४ रुपये पडतो तर पाईपलाईनद्वारे केवळ ३० पैसे खर्च येतो.समुद्र नसलेल्या देशातील रिफायनरीजदेश रिफायनरीज१) आॅस्ट्रिया १२) अझरबैजान २३) बेलारूस २४) बोलिव्हिया ५५) चाड १६) झेकोस्लोवाकिया ४७) हंगेरी २८) कझाखस्तान ३९) मॅसिडोनिया ११०) नायझर १११) सर्बिया ३१२) स्लोव्हाकिया २१३) स्विर्त्झलंड २१४) तुर्कमेनिस्तान २१५) झांबिया १एकूण ३२

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पMaharashtraमहाराष्ट्रNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प