शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...तर शासकीय कर्मचा-यांना वेतनवाढ, पदोन्नती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 16:16 IST

अ, ब व क संवर्गाचा समावेश

गणेश वासनिक अमरावती : राज्य शासनाच्या आस्थापनेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणक हाताळणी आणि वापराचे परिपूर्ण ज्ञान अनिवार्य आहे. अन्यथा यापुढे कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.शासन-प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असलेल्या कर्मचाºयांना बदलत्या काळानुसार त्यांचे ज्ञानात अधिक भर पडावी. प्रशासनाकडून नागरिकांचे कामे सुलभतेने आणि वेळेपूर्वी व्हावे, यासाठी गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचा-यांना संगणकाचे ज्ञान अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९९९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. शासन अधिसूचना २५ जानेवारी १९९९ व ३ मे २००० आणि २८ मे २०१८ अन्वये शासकीय कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान आवश्यक केले आहे. मात्र, बहुतांश विभागातील  समावेश गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांनी अद्यापही संगणक हाताळणी, वापराचे ज्ञान विकसित केले नाही. त्यामुळे अशा कर्मचाºयांकडे असलेल्या नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत होत नाही. कार्यालयप्रमुखांनी अनेकदा संगणकाचे ज्ञान नसलेल्या कर्मचा-यांना नोटीस वजा आदेशान्वये शासन निर्णयाची जाणीव करून दिली आहे. परंतु, सरकारी कर्मचारी म्हटले की, ‘काय होते’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे.

मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी ३ जुलै २०१८ रोजी परिपत्रक जारी करून कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असे आदेश निगर्मित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांवर सोपविली आहे. राज्यात १९ लाख कर्मचारी असून, यात सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचा समावेश आहे.

वयाची ५० वर्षे पूर्ण करणा-यांना सूटशासन सेवेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही, असे आदेश आहेत. मात्र, या आदेशातून वयाची ५० वर्षे पूर्ण करणाºया कर्मचा-यांना सूट देण्यात आली आहे. कर्मचाºयांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण नसले तरी वय ५० पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा शासन निर्णयानुसार लाभ मिळणार नाही, हे वास्तव आहे.

बदलत्या काळानुसार कर्मचाºयांना कामात बदल करणे अपेक्षित आहे. नागरी सुविधांमध्ये झपाट्याने आमूलाग्र बदल होत असल्याने कर्मचा-यांनी संगणकाचे ज्ञान प्राप्त करणे काळाची गरज आहे. यापूर्वीच कर्मचा-यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षणाबाबत मााहिती दिली आहे.- नामदेव गडलिंग,जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अमरावती