शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

१६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

By यदू जोशी | Updated: February 16, 2018 01:41 IST

प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.

मुंबई : प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.या गावांत स्वत:च्या मालकीच्या जागेत, शेतात वा पडीक सरकारी जमिनीवर अंत्यसंस्कार उरकले जातात. उघड्यावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही सुविधा नसतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये तर मृतदेह अर्धवट जळून त्यांची अक्षरश: विटंबना होते. अनेक गावे अशी आहेत की, जिथे सवर्ण जातींतील व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात तिथे दलितांना अंत्यविधी करण्यास मनाई केली जाते. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण होतात.मराठवाड्यातील लालसेनेचे नेते गणपत भिसे यांनी या प्रश्नावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. प्रगत महाराष्ट्रात मरणानंतरही माणसांचे हाल का व्हावेत, असा सवाल त्यांनी केला.राज्यातील ज्या २८ हजार २१ खेड्यांबाबत माहिती एकत्रित करता आली. त्यातील १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमींची महसूल खात्याकडे नोंद नाही. उर्वरित गावांमध्ये स्मशानभूमीची नोंद आहे; पण तिथे स्मशानभूमी आहे असे नाही. अनेक गावांत स्मशानभूमींच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. स्मशानभूमीच नसलेल्या गावांत शेतांमध्ये, नदी वा ओढ्याच्या काठावर, गायरान, महारवतनाच्या जागेवर अंत्यविधी केले जातात. या पार्श्वभूमीवर, स्मशानभूमींपासून वंचित असलेल्या गावांत एका मॉडेलच्या आदर्शस्मशानभूमी उभाराव्यात आणि तिथे सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना समोर आली आहे. एक गाव एक पाणवठा या संकल्पनेने महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालून दिले, एक गाव, एक स्मशानभूमी मात्र अजूनही १६ हजार गावांच्या नशिबी नाही. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिले. मात्र स्मशानभूमींअभावी राज्याच्या ग्रामीण भागात, जगण्याने न केली सुटका, मरणानेही छळले आहे’.स्मशानभूमीच नसलेल्या गावांची विभागनिहाय संख्याकोकण २२३७नाशिक २४८२पुणे ३५७८नागपूर २७०१अमरावती २४१७औरंगाबाद २७८१

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र