शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात वावगं नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 06:50 IST

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक विविध वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. 

बारामती : संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक विविध वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, अजित पवारांचे संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिले; पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेले लिखाण कोणालाही पसंत पडणारे नाही; पण ते कधीकाळी लिहिलेले होते. ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र, संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही. काही नागरिक, व्यक्ती, घटक संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करतात, तर काही घटक संभाजीराजे यांच्याकडे धर्मवीर म्हणून पाहत असतील, तर त्याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले.महाराष्ट्रात भाजपच्या वतीने ४५ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची  घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ ऐवजी मिशन ४८ करायला पाहिजे, असा टोला पवार यांनी लगावला.विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या संपर्कात नसल्याचे पत्रकारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यावर माझी व त्यांची भेट नाही. ते माध्यमांशी बोलतील, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार