शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:32 IST

एमएमआरडीएने १० जून रोजी पत्र लिहून एल अँड टीला या प्रकल्पाच्या आर्थिक निविदेसाठी भरलेला संपूर्ण आर्थिक अंदाजपत्राचा तपशिल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: एल अँड टी कंपनीने मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाचा अंदाजित खर्च, दरपत्रक आणि त्यास पूरक कागदपत्रांची प्रत आठवड्यानंतरही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सादर केलेली नाही. एमएमआरडीएने १० जून रोजी पत्र लिहून एल अँड टीला या प्रकल्पाच्या आर्थिक निविदेसाठी भरलेला संपूर्ण आर्थिक अंदाजपत्राचा तपशिल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मीरा भाईंदर ते गायमुख हा १५.५ किमी लांबीचा मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एल अँड टी कंपनीने भरलेल्या निविदा तांत्रिक तपासणीत एमएमआरडीएने बाद केल्या होत्या. 

एमएमआरडीएने निविदा कोणत्या कारणांनी बाद केल्या याची माहिती एल अँड टीला दिली नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयात त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे एल अँड टीने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.

पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थितसुनावणीवेळी एल अँड टीने न्यायालयात उन्नत मार्गासाठी ५,५५४ कोटींची, तर रस्ता आणि भुयारी मार्गासाठी ६,४९८ कोटी रुपयांची निविदा भरल्याचे सांगितले होते. ही निविदा या प्रकल्पासाठी लघुतम निविदा दाखल केलेल्या मेघा इंजिनियरिंगपेक्षा ३,१०० कोटी रुपयांनी कमी असल्याचे न्यायालयात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करून निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एमएमआरडीएने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने या निविदा रद्द करण्याची तयारी दर्शविली होती.

‘एल अँड टी’ अपात्र का?- तेलंगणातील मेडिगड्डा बॅरेज दुर्घटनेचा खुलासा न करणे.- बोली प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांचा अपुरा पुरवठा.

निविदा प्रक्रिया  पुन्हा राबवणारएमएमआरडीए पुन्हा निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. एल अँड टीने दिलेली माहिती टेन्डर रिव्ह्यू कमिटीकडे पाठविणार असून त्याआधारे पुढील बोलीदात्यांसाठी तुलनात्मक आधार निश्चित केला जाईल, असे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. त्या माहितीचा सविस्तर आढावा घेऊन, तज्ज्ञांच्या मदतीने अंदाज पुन्हा तयार करण्यात येतील, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकता आणि न्याय्य तत्वांशी सुसंगत राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबईroad transportरस्ते वाहतूक