शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना मनसेत नवी संधी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 05:58 IST

शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांनी आचारसंहिता बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

महेश पवारमुंबई : वरळी येथील मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच पक्षाची आचारसंहिता बनवित आहेत. पक्ष स्थापनेवेळी नाव आणि झेंडा कोणता असेल, हा निर्णय त्यांनी घेतला. आताही पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून आराखडा तयार करीत आहेत. यामुळे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना पक्षात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे, असे मनसे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वरळीतील मेळाव्यात नेते, विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आचारसंहिता लागू करून पदांमध्ये बदल करून निराश लोकांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे या आचारसंहितेची उत्सुकता लागली आहे.

राज ठाकरे आचारसंहिता ९ मार्चला जाहीर करणारशिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांनी आचारसंहिता बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी ते ठराविक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहेत. मात्र, आराखडा बनविण्यासाठी कुणाची मदत घेत नाहीत. त्याची गुप्तता बाळगली जात आहे. ९ मार्चला वर्धापनदिनी मेळाव्यातून पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यासाठी आचारसंहिता बनविण्याचे काम सुरू आहे. त्यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. एक-दोन दिवसांमध्ये त्याची बैठक होणार आहे. - बाळा नांदगावकर, मनसे नेते 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे