शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:17 IST

हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल, तर औंध संस्थानच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल

छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासह प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने नवा जीआर काढला. याची अंमलबजावणी करताना दगाफटका केला, तर सुपडा साफ होईल, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी येथे दिला. या जीआरवर विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

ओबीसी समाजासाठी सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करत आता मायक्रो ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठीही उपसमित्या स्थापन कराव्यात, असा खोचक सल्लाही जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल, तर औंध संस्थानच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल.  या जीआरवर विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. आपल्याला काहीच मिळाले नाही, अशी बोंब कोणीही मारू नये.

‘...तर थेट वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी गेलो असतो’मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. याविषयी जरांगे म्हणाले की, मला जर फडणवीस यांना अडचणीत आणायचे असते, तर थेट वर्षावर गेलो असतो. मी समाजासाठी तेथे गेलो. मला राजकीय पक्षांशी देणेघेणे नाही. मी कशाला कोणाला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू देऊ?

छगन भुजबळ सरकारचे मालक आहेत का?मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यामुळे भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता भुजबळ सरकारचे मालक आहेत का, असा प्रतिप्रश्न जरागेंनी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती