शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:36 IST

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर  पुढील चार-पाच महिन्यांत होणे अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच काही नव्या राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत राजकीय पक्ष असून, त्यातील १५८-१६० पक्षांच्या नावात ‘आघाडी’ तर ४०-४२ ‘सेना’ असा उल्लेख असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर  पुढील चार-पाच महिन्यांत होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत तुलनेत खूपच लहान प्रभाग असल्याने छोट्या पक्षांच्या अपेक्षा वाढतात. अशा लहान ४०३ राजकीय पक्षांची नोंद आयोगाकडे करण्यात आली आहे. 

आयोगाकडे लातूरमधून ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ नावाच्या पक्षाची नोंद झाली असून, सांगोल्यातील ‘शेतकरी आघाडी’, म्हसवड येथील ‘नागोबा विकास आघाडी’ यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, यादीत वंचित बहुजन आघाडीच्या मुख्यालयाचा पत्ता बारामतीचा आहे. याशिवाय ‘बंडखोर सेना’, ‘मुस्लीम सेना’, ‘टिपू सुलतान सेना’, ‘उत्तर भारतीय विकास सेना’ असे पक्षही नोंदणीकृत झाले आहेत.

नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष : भारतीय जनता पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आम आदमी पार्टी.राज्यस्तरीय पक्ष : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार.

गेल्या सहा महिन्यांत १२ नवे राजकीय पक्ष आयोगाकडे ५ राष्ट्रीय पक्ष, ५ प्रादेशिक (राज्यस्तरीय) आणि १० इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचीही नोंद आहे. गेल्या सहा महिन्यांत १२ नवे राजकीय पक्ष नोंदवले गेले असून, काही जुने नोंदणी रद्द झालेले पक्षही अटी-शर्तींची पूर्तता करून नोंदणी पूर्ववत करीत आहेत. आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष विहित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत आपापले उमेदवार उभे करू शकतात, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण