शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"...तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती’’, चिथावणीखोर भाषणांवरून नितेश राणे यांनी अबू आझमींना सुनावले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:24 IST

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले. अबू आझमी यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता चिथावणीखोर भाषणांचा उल्लेख केला आणि धर्म आणि महापुरुषांविरोधात होणाऱ्या भाषणांविरोधात कठोर कायदा आणण्याची मागणी केली. तसेच देशात ऐक्य टिकवण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आक्रमक होत अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती, असा टोला लगावला.

अबू आझमी यांनी चिथावणीखोर भाषणांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाचा मुद्दा उपस्थित करताना सांगितलं की, अध्यक्ष महोदय मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो की, तुम्ही एका असा कायदा आणा की, जर कुणी कुठल्या धर्माविरोधात, महापुरुषांविरोधात काही बोललं तर त्याला जामीन मिळता कामा नये. तो किमान दोन-चार वर्षे तुरुंगात राहावा आणि किमान त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा व्हावी. हिंदू  आणि मुस्लिमांमध्ये भाईचारा असणं आवश्यक आहे. हिंदू-मुस्लिमांमधील नातं तुटलं तर भारत तुटेल. त्यामुळे धर्माविरोधात बोलणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळेल, असा कायदा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज द्यावं. असं केल्यास महाराष्ट्रामधील ५० टक्के कायदा आणि सुव्यवस्था दुरुस्त होईल. एक साहेब सांगतात मशिदीत घुसून मारेन, अरे का मारणार, आमची काय चूक आहे. कुराण वाचू देणार नाही, स्पीकर बंद करणार, अध्यक्ष महोदय, हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. आपापसात मिळून राहणारा देश आहे, असे अबू आझणी यांनी सांगितले, त्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना तिथेच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. 

अबू आझमी यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, अबू आझमीजी भाईचारा वगैरे बोलताहेत तसं काही नाही आहे. ते चुकीची माहिती देत आहेत. ते दुसरी बाजू समजून घेत नाही आहेत. आधी गणेश मिरवणुकीवर दगड कोण मारणार, आमची मंदिरं कोण तोडणार. अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित समजवा. आम्हाला त्यांचं भाषण ऐकायच आहे. आता आम्ही मंत्री झालोय, आता आम्ही त्यांचं भाषण ऐकणार, अध्यक्ष महोदय, तुम्ही अबू आझमी यांना वस्तुस्थितीला धरून बोलायला सांगा. बाकी सत्य काय आहे हे महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते, असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावला.   

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNitesh Raneनीतेश राणे Abu Azmiअबू आझमी