शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर ज्येष्ठ नागरिक कायदा लागू होत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:49 IST

ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत न्यायाधिकरणाने ऑक्टोबर २०२३ मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या विमल दगडू काटे आणि तिच्या कुटुंबाने (याचिकाकर्त्यांनी) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होती.

मुंबई :  मालमत्तेच्या वादात एका ज्येष्ठ नागरिकाकडून दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण कायदा, २००७ लागू करू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. ही कार्यवाही पहिल्या मजल्यावरील जागेचा ताबा परत मिळवण्याच्या दाव्याच्या स्वरूपाची आहे, जी न्यायाधिकरणाद्वारे विचारात घेतली जाऊ शकत नव्हती, असे न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने म्हटले.

ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत न्यायाधिकरणाने ऑक्टोबर २०२३ मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या विमल दगडू काटे आणि तिच्या कुटुंबाने (याचिकाकर्त्यांनी) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होती. या आदेशाद्वारे न्यायाधिकरणाने याचिकाकर्त्यांना झोपडपट्टीच्या इमारतीचा पहिला मजला रिकामा करण्याचे निर्देश दिले. ही तक्रार विमल काटे यांच्या लहान बहिणीने केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, ती तळमजल्यावर राहते आणि मोठ्या बहिणीने पहिल्या मजल्यावर अतिक्रमण केले. 

न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर हे प्रकरण ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीशी किंवा कल्याणाशी संबंधित नसून हा वाद मालमत्तेशी संबंधित आहे आणि हे प्रकरण दिवाणी न्यायालयात सोडविले पाहिजे, असा युक्तिवाद काटे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, काटे तिच्या बहिणीला सांभाळण्यास बांधील नाही म्हणूनच न्यायाधिकरणाला काटे यांना मालमत्तेतून बेदखल करण्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर करण्यात आला.न्यायालयाने न्यायाधिकरणाचे आदेश रद्द करत विमल काटे यांना जागेचा ताबा परत केला. लहान बहिणीला दिवाणी न्यायालयात जाण्याची मुभा दिली.