शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग राऊतांनी उद्धव यांनाही चोर म्हटले ! शिंदे गटाचा सभागृहात जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 07:03 IST

राऊत म्हणजे सकाळचा भोंगा आहे. आज तर त्यांनी हद्द केली. त्यांचे पोलिस संरक्षण काढा, असे शिरसाट म्हणाले.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधिमंडळाला चोर म्हटल्याने संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव आणि आदित्य यांनाही चोर म्हटले आहे. या सभागृहातील सगळ्यांनाच त्यांनी चोर म्हटले आहे. राऊत यांच्या डोक्यात फरक पडला आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बुधवारी विधानसभेत केला. आम्हाला चोर म्हणता पण आमची मते घेऊनच तर तुम्ही खासदार झालात हे लक्षात ठेवा, असे खडेबोल मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुनावले.

 अजित पवार, छगन भुजबळ, भास्कर जाधव, नाना पटोले यांनाही त्यांनी चोर म्हटले आहे. राऊत म्हणजे सकाळचा भोंगा आहे. आज तर त्यांनी हद्द केली. त्यांचे पोलिस संरक्षण काढा, असे शिरसाट म्हणाले.  

 मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राऊत यांनी आम्हाला डिवचायचा ठेका घेतला आहे का? आमची मते घेऊन ते खासदार झाले, आम्ही त्यांच्यासारखे मागच्या दाराने आलेलो नाही. या माणसाने शिवसेनेची वाट लावली, उद्धव यांना उल्लू केले. तीस-तीस वर्षे पक्षसेवा करणाऱ्यांना बाहेर काढले. शिवसेनेचा सत्यानाश केला. चोरांची मते घेऊन खासदार झालो, असे वाटत असेल तर राऊतांनी तत्काळ राजीनामा द्यावा. 

कोण काय म्हणाले?nमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिवेशन संपण्याच्या आधी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. nभाजपचे कालिदास कोळंबकर, नीतेश राणे यांनी राऊत यांचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी केली.nसभागृहातील महिला आमदारांना राऊत यांनी वेश्या म्हटले होते, आता सभागृहालाच ते चोरमंडळ म्हणत आहेत, तत्काळ कारवाई करा अशी मागणी शिरसाट यांच्यासह आशिष जयस्वाल, यामिनी जाधव यांनी केली.

अतुल भातखळकर, आशिष शेलार बरसले भाजपचे अतुल भातखळकर आणि आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केले. जवळच्या माणसाला अटक झाल्याने राऊत यांना नैराश्य आले आणि त्यातून तर ते तसे बोलले नाहीत ना? असा सवाल भातखळकर यांनी केला. राऊत यांच्या विधानाने महाराष्ट्राची जगभरात अप्रतिष्ठा झाली आहे. त्यांचे विधान हा महाराष्ट्रद्रोह आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता अन् बोटचेपेपणा न करता त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या दोघांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा