शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर ओबीसींचे शैक्षणिक, नोकरीतील आरक्षण जाईल, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 05:26 IST

Prakash Ambedkar : एका कार्यक्रमासाठी रविवारी ते नागपुरात आले असता रवीभवन येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. इम्पिरिकल डेटा मिळत नसल्याने त्याचा विरोध केला पाहिजे.

नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असाच राहिला तर भविष्यात शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही धोक्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांची मुस्लीम आरक्षणाबाबतची भूमिका ‘आरएसएस’सारखी असल्याची टीकाही त्यांनी केली.एका कार्यक्रमासाठी रविवारी ते नागपुरात आले असता रवीभवन येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. इम्पिरिकल डेटा मिळत नसल्याने त्याचा विरोध केला पाहिजे. गोवारीसारखी अवस्था होऊ नये, असे ओबीसींना वाटत असेल तर त्यांनी समाजात जागृती करावी. प्रत्येक समाजाने मेळावे घेतले पाहिजेत. आम्ही ओबीसींसाठी आंदोलन केले. मोर्चा काढला. आता जिल्हापातळीवर आंदोलनाची तयारी आहे. ओबीसीने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी आमच्याकडे मत मागायला येऊ नये, असे बोर्ड लावावेत. मत पाहिजे असेल तर आमचे आरक्षण परत द्या, अशी मागणी करावी. मुस्लीम आरक्षणाबाबत मंत्री नवाब मलिक दिशाभूल करीत आहेत. त्यांची भूमिका वस्तुस्थितीला धरून नाही. मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दिले होते. ते आता आरक्षण ५० टक्क्यांवर जात असल्याची भाषा करीत आहेत. आरएसएसची भूमिकासुद्धा मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशीच आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBC Reservationओबीसी आरक्षण