शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

...तर स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करा- शिवसेना

By admin | Published: June 16, 2017 5:14 PM

17 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - 17 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष स्वतःच्या उमेदवारावर जोर देत आहेत. त्याच वेळी शिवसेनेनंही नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत ही आमची पहिली पसंती आहे. तरीही भागवत यांच्या नावाला कोणाची अडचण असेल तर स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावं, ही आमची मनापासून इच्छा आहे, अशी भूमिका शिवसेनेनं स्पष्ट केली आहे. कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्यांना पर्याय नसल्यास स्वामिनाथन यांना पर्याय माहिती आहेत का, त्यांना जर पर्याय माहिती असतील तर त्यांनाच राष्ट्रपती करावं, असंही शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. अमित शहा यांच्याकडे एखादं चांगलं नाव असेल तर त्याचा विचार करू, मात्र राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 16 ते 18 जून दरम्यान तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मित्रपक्ष शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अमित शहा या दौऱ्यात करणार आहेत. ते रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाचे दर्शन शुक्रवारी घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांविरुद्ध सातत्याने टीका करीत असताना शहा हे कटुता कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 तर दिल्लीत भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू केली असून, नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी केली होती. त्यांनी आज तेलुगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशीही चर्चा केली आहे. वेंकय्या नायडू यांनी काल प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधून, आपणास शरद पवार यांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण पवार दिल्लीत नव्हते. त्यामुळे आज ते पवार यांच्याशी फोनवर बोलले. आपण दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष बोलू, असे पवार यांनी नायडू यांना सांगितले आहे. वेंकय्या नायडू यांनी चंद्राबाबू यांनाही चर्चेसाठी दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले होते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह सोनिया गांधींचीही भेट घेतली होती. सोनिया गांधीच्या 10 जनपथ रोडवरील निवासस्थानी व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनी भेट घेतली आहे.