शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

CoronaVirus: ... तर कोरोना महामारी नाही, ठरणार साथीचा आजार; महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 06:53 IST

Corona Virus in Maharashtra: राज्यात अधिक तीव्रतेने आलेल्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ‘डेल्टा’ हेच होते. सध्या राज्यात ‘डेल्टा’ने बाधित झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. गेल्या काही महिन्यांत निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्णांसह मृत्यूचे प्रमाण आटोक्यात राहिले आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबरपर्यंत सर्व पातळ्यांवरील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात राहिल्यास महामारीऐवजी (पॅन्डेमिक) केवळ एक साथीचा आजार (एन्डेमिक) म्हणून कोरोनाची वाटचाल सुरू होईल, असे निरीक्षण राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी मांडले आहे.

राज्यात अधिक तीव्रतेने आलेल्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ‘डेल्टा’ हेच होते. सध्या राज्यात ‘डेल्टा’ने बाधित झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. आपण सातत्याने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठवून लक्ष ठेवून आहोत. परंतु गेल्या चार महिन्यांत कोरोना विषाणूच्या रूपात फारसा बदल झालेला आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास डेल्टाविरोधात प्रतिकारशक्ती तयार झालेल्या समाजात पुन्हा ‘डेल्टा’मुळेच लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे, असे निरीक्षण कोरोना टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशी यांनी मांडले आहे.

एन्डेमिक म्हणजे नेमके काय?स्वाइन फ्लूचा आता मोठा उद्रेक होताना दिसत नाही. परंतु दर महिन्याला काही रुग्ण आढळतात. त्याप्रमाणेच पुढील काळात कोरोनाही ‘ॲन्डेमिक’ स्थितीमध्ये आपल्या सोबत असणार आहे.

कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यकचगेल्या दोन, तीन महिन्यांत वातावरणीय बदलांच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे, याचाच अर्थ कोरोना विषाणू काही प्रमाणात कमकुवत झालेला आहे, असा निष्कर्ष काढता येईल. दुसरे म्हणजे, विषाणूचा प्रसार आटोक्यात आला असला तरी एखाद्या विभागात, प्रदेशात छोट्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी मास्कचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर आणि हातांची स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यकच असल्याचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. 

कोव्हॅक्सिनला डब्ल्यूएचओची मान्यताजागतिक आरोग्य संघटनेने भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन या लसीला अखेर आपत्कालीन वापरासाठी बुधवारी मंजुरी दिली. लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता यावर आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केल्याने आता जगभरातील देशांनाही ही लस घेता येईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या