शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांची’ दिवाळी साजरी होणार नवीन घरांत

By admin | Updated: October 18, 2016 03:35 IST

कचोरे आणि डोंबिवली,इंदिरानगर परिसरातील बीएसयूपीच्या प्रकल्पात लवकरच २९२ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याने त्यांची दिवाळी नवीन घरांत साजरी होणार आहे

कल्याण : कचोरे आणि डोंबिवली,इंदिरानगर परिसरातील बीएसयूपीच्या प्रकल्पात लवकरच २९२ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याने त्यांची दिवाळी नवीन घरांत साजरी होणार आहे.दिवाळीपूर्वी या नव्या सदनिकांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. केडीएमसी क्षेत्रातील शहरी गरिबांना घरकुले बांधून देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा हा बीएसयूपी प्रकल्प १०८ कोटी २७ लाखांचा असून त्यामध्ये केंद्रशासनाचे ४७ कोटी ५३ लाख, तर राज्यशासनाचे ३५ कोटी ५४ लाखांचे अनुदान आहे. याआधी केंद्राने ३० कोटी ५८ लाखांचे अनुदान दिले होते. परंतु, कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने केंद्र शासनाने उर्वरित १७ कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. त्यातच घोटाळ्यांच्या आरोपाने हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने हा प्रकल्प मार्गी लागेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. दरम्यान, जून महिन्यात आयुक्त ई. रवींद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्राच्या नगरविकास विभागाचे सचिव अध्यक्ष असलेल्या सेंट्रल मॉनिटरिंग कमिटीसमोर बीएसयूपीच्या कामांचे सादरीकरण केले होते. त्यामुळे कामाला गती आली आणि केंद्राकडून १७ कोटींचे रोखलेले अनुदान प्राप्त झाले. आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेता ८ हजार १८८ सदनिकांपैकी ४८१ सदनिका बांधून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. कचोरे येथील १०८२ आणि कल्याणच्या इंदिरानगरमधील ३३० अशा एकूण १४१२ सदनिका तयार आहेत, तर उर्वरित ६ हजार २९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. २००९ मध्ये इंदिरानगर येथील बीएसयूपी प्रकल्पाचे काम सुरू झाले. करारानुसार हे काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. परंतु, २०१६ उजाडले तरी मूळ लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नव्हता. आता याठिकाणच्या ३ इमारती बांधून झाल्याने १४० लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहेत. घरभाड्याच्या मुद्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या माने यांनी न्यायालयात धाव घेतली होती. लाभार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कचोरे येथील प्रकल्पामध्येदेखील १५२ लाभार्थ्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यापूर्वी याठिकाणी १५२ लाभार्थ्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>त्यांना घरांचा ताबा महिन्यानंतरविशेष बाब म्हणजे कल्याणमधील आधारवाडी परिसरातील साठेनगरवासीयांनादेखील लवकरच घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेथील आतापर्यंत पात्र ठरलेल्या ३९ जणांचे उंबर्डे येथील घरांमध्ये पुनर्वसन केले जाणार असून दिवाळीपूर्वी चाव्यांचे वाटप केले जाणार असले तरी इमारतींच्या लिफ्टला एनओसी न मिळाल्याने महिनाभरानंतर त्यांना घरे ताब्यात मिळतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता जोशी यांनी दिली.