शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मृतदेह सोडून साथीदार झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 12:37 IST

बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ह्रदयविकाराचा झटका आलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कऱ्हाडजवळच्या गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

सातारा- बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ह्रदयविकाराचा झटका आलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कऱ्हाडजवळच्या गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडजवळ असणाऱ्या गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक असून बंगल्यातच त्यांनी गोडाऊन व कार्यालय सुरू केलं आहे.

संबंधित बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसतं. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोशी नेहमीप्रमाणे बंगल्यात आले असता व्हरांड्यात कोणीतरी अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधिताचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना समजलं. त्यामुळे जोशी यांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोशी यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचटकल्याचे दिसून आलं. तसंच पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत होते.

बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसंच संबंधित व्यक्ती चोर असावी, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधिताच्या खिशात कऱ्हाडातील एका थिएटरचे रात्रीच्या ‘शो’चे तिकीट आढळलं असून त्यावर तीन व्यक्तींसाठी असा उल्लेख आहे. त्यामुळे या चोरट्यासोबत अन्य दोघं असावेत, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.