मुंबई : कांदिवली येथे दोन मोठ्या चोऱ्या झाल्याच्या घटना रविवारी मध्यरात्री घडल्या. या घटनेतील चोराचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाला असून, कांदिवली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कांदिवली (पश्चिम) येथील रिलायन्स एक्स्प्रेसमध्ये ही चोरी झाली. यात दुकानातील लॅपटॉप आणि रोकड असा एकूण पंधरा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याच परिसरात आणखी एका दुकानातून दहा लाखांचा ऐवज चोरी झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या चोराचे रेखाचित्र तयार करून त्यांचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणांत आम्ही अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले. पोलीस यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
रिलायन्स एक्स्प्रेसमध्ये लाखोंची चोरी
By admin | Updated: June 28, 2016 02:04 IST