शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:05 IST

दोघांचा उत्कर्ष साधू; कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाही

मुंबई : आरक्षण विषयक मराठा तसेच ओबीसी समाज मंत्रिमंडळ उपसमिती समांतर कार्य करेल. दोन्ही समाजांचा उत्कर्ष आमचा सरकार साध्य करेल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा ओबीसी समाजासाठीच्या मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

हैदराबाद गॅझेटसंदर्भात शासनाने काढलेला जीआर स्वयंस्पष्ट आहे. आतापर्यंत ज्यांच्या कुणबी नोंदी दुर्लक्षित राहिल्या होत्या त्यांना योग्य प्रक्रिया पार पाडून प्रमाणपत्र मिळणार आहे. या जीआरबाबत कोणत्याही समाजाने संभ्रमात राहण्याची आवश्यकता नाही. आम्ही कोणाच्याही ताटातले काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळेल, त्याचवेळी ओबीसी समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 

...मग तेलंगणाप्रमाणे मागासवर्गीयांना ४२ टक्के आरक्षण देणार का? - हर्षवर्धन सपकाळराज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन निर्णय काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२ टक्के आरक्षण दिले, तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी चर्चा असताना सरकार मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावलेला नाही असे सांगत आहे. दोन्हीपैकी एक बरोबर असू शकते, दोन्हीही बरोबर कसे, हे सरकारने स्पष्ट करावे, असेही सकपाळ म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. याची दखल घेत राज्य सरकारने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. सरकार दोन समाजाला कधीच आमने-सामने येऊ देणार नाही. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ओबीसी आयोगाला केंद्रात संवैधानिक दर्जा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय गठित केले. आमची समिती देखील ओबीसी समाजाच्या हिताची काळजी घेईल, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaratha Reservationमराठा आरक्षण