शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाची झळ गावखेड्यापर्यंत! तेल, चटणी आणि भाकरीही महागली; ज्वारीची ५,३०० रुपयांपर्यंत झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:23 IST

मंगळवेढा बाजारपेठेत ज्वारीला विक्रमी दर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तेल, चटणी आणि कांदा भाकरी यावर दिवस काढणाऱ्या सर्वसामान्याला आता या वस्तूंच्याही महागाईची झळ बसू लागली आहे. ज्वारीचे उत्पादन घटले तर मिरचीला अवकाळीचा दणका बसला. इराण अमेरिका युध्दामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीने आघाडी घेतली आहे. इतिहासात प्रथमच ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार ३०० पर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे.

यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, ‘मालदांडी ’ ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. उत्तम प्रतीच्या ज्वारीला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, सरासरी दर्जाच्या ज्वारीस ४५०० रुपयांपासून भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी मालाची गुणवत्ता टिकवून ठेवली तर पुढील काही काळही ज्वारीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी नाराज होते. मात्र, यंदा परिस्थितीती बदलली असून ज्वारीला चांगले दिवस आले आहेत.

चांगल्या प्रतीच्या मालाला स्पर्धात्मक दर

बाजारातील स्थिती स्पष्ट करताना मंगळवेढ्यातील आडत व्यापारी पांडुरंग नकाते म्हणाले, यंदा ज्वारीचे उत्पादन कमी आहे. मात्र, दर्जात मोठी सुधारणा दिसत आहे. बाजारात मागणी सातत्याने वाढत असून, चांगल्या प्रतीच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळत आहेत.

खाद्यतेलाच्या दरात वाढ

धान्यासोबतच तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीनच्या तेलात तब्बल ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. आधी तेल १३० ते १३५ रुपये किलो होते.आता १७० रुपये किलो झाले आहे. तसेच शेंगदाणा तेलाचे दर ३० रुपयांनी वाढले आहे. आधी १७० रुपये किलो असलेले दर २०० रुपये झाले आहे.

मिरची किलोमागे शंभर रुपयांनी वाढली

एकीकडे उन्हाचापार वाढल्याने नागरिकांना चटके सहन करावे लागत असताना  दुसरीकडे लाल मिरचीने ग्राहकांचे तोंड होरपळून निघाले आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मिरचीच्या दरात सरासरी प्रतिकिलो शंभर रुपयांची वाढ झाली आहे. खरीप हंगामातील मिरचीला पावसाने फटका बसला आणि त्यानंतरच्या हंगामावरही अवकाळीचे पाणी पडल्याने आवक कमी झाली आहे.आपल्याकडे पावसाळी बेगमी म्हणून जानेवारी-फेब्रुवारीपासून चटणी करून ठेवण्याची पद्धत आहे. मार्चनंतर हे प्रमाण वाढत जाते. मात्र, यंदा खरीप हंगामातच परतीच्या पावसाने मिरची पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बाजारात लाल मिरची पहिल्यापासूनच तेजीत आहे. आपल्याकडे ‘ब्याडगी’लाच अधिक पसंती दिली जाते. मे महिन्यात मिरचीला सर्वाधिक मागणी असते. मात्र यंदा तेवढी आवक शक्य नाही. त्यामुळे, एप्रिलपेक्षा मे महिन्यात किलोमागे किमान ५० रुपयांची वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War Impact: Food Prices Soar in Villages; Jowar Reaches ₹5,300

Web Summary : Rising food prices, spurred by weather and global conflict, hit rural India. Jowar prices surged due to lower yields and high demand. Edible oil and chili prices also increased sharply, impacting daily essentials.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरfoodअन्नLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई