शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंची समिती ठरवणार ई-अभ्यास मंडळांचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 12:07 IST

राज्यामध्ये एकसमान अभ्यासक्रम आराखडा तयार होण्याच्या तसेच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने समिती काम करेल.

मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा एकसमान राहण्याच्या दृष्टीने विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि प्रस्तावित ई - अभ्यास मंडळ मंचांना मार्गदर्शन करण्यासाठी कुलगुरूंची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०ची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या धोरणाचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता.

या कार्यबल गटाने अहवाल शासनास सादर केला आहे. सर्व विद्यापीठांच्या संबंधित विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांचे प्रतिनिधीत्व असलेला ई - अभ्यासमंडळ मंच स्थापन केला जाईल, अशी शिफारस होती.

...अशी असेल समितीची कार्यकक्षा राज्यामध्ये एकसमान अभ्यासक्रम आराखडा तयार होण्याच्या तसेच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने समिती काम करेल. समन्वय समिती ई- अभ्यासमंडळ मंचामधील सदस्य संख्या व प्रतिनिधीत्त्वाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करेल. समन्वय समिती ई-अभ्यासमंडळ मंचाच्या प्रभावी कामकाजासाठी आराखडा तयार करेल व त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करेल. त्याचप्रमाणे, ई - अभ्यासमंडळ मंचाचे सनियंत्रणही करेल.  सर्व ई - अभ्यासमंडळ मंचाच्या वार्षिक अहवालाचा कार्यकारी सारांश समन्वय समितीद्वारे संकलित केला जाईल आणि कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत सादर केला जाईल. समन्वय समितीचा कालावधी हा प्रथम टप्प्यात दोन वर्षांसाठी असेल.

टॅग्स :Educationशिक्षण