शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शासन आपल्या दारी’चे मूल्य आता तीन कोटींवर; जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 06:42 IST

या कार्यक्रमाचा खर्च ५२.९० कोटींवर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तहसील कार्यालयापासून ते भूमिअभिलेखपर्यंतची सर्व कामे एक खिडकी योजनेंतर्गत एकाच कार्यक्रमात व्हावीत यासाठी सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ योजना आणण्यात आली. भव्य कार्यक्रम, भव्य सभामंडप, भव्य व्यासपीठ या तामझामासह हा कार्यक्रम जिल्ह्याजिल्ह्यांत पार पडतो. सरकारच थेट जनतेच्या दारात पोहोचत असल्यामुळे आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता या योजनेच्या खर्चातही वाढ करण्यात आली आहे. नियोजन विभागाकडून या उपक्रमाची खर्च मर्यादा थेट एक कोटीवरून तीन कोटी इतकी करण्यात आली आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहतात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा लोकाभिमुख कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू नये याची काळजी सरकारकडून घेण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याआधी एक कोटीची खर्चमर्यादा आता थेट तीन कोटीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नाशिकमधील कार्यक्रमासाठी अलीकडेच एसटीने महिलांना आणण्यासाठीचा खर्च ५५ लाखांवर पोहोचला.  याव्यतिरिक्त जेवण, मंडप, सिटीलिंक बस यांचा खर्च एक कोटीच्या मर्यादित निधीत कसा भागवायचा हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना पडला. त्यानंतर नियोजन विभागाने ही मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला.

होणारी कामे...

शिधापत्रिका, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न, जातीचा, नॉन क्रिमिलियर दाखला, मतदार नोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती याबरोबरच संजय गांधी योजना, सलोखा योजना, कन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचे लाभ या योजनेमार्फत थेट लोकांपर्यंत पोहोचवले जातात.

आतापर्यंत ५२ कोटी

या कार्यक्रमाचा खर्च ५२.९० कोटींवर पोहोचला आहे. सरकारकडूनच ही आकडेवारी पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. खर्च मर्यादा वाढल्याने आता हा खर्च शेकडो कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र