शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:16 IST

वारीच्या ऐतिहासिक व पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना व नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी 'ai-Dindi' नावाची एक अभिनव संकल्पना साकार झाली आहे.

जसा जून महिना जवळ येतो, तसे आषाढी एकादशीच्या वारीचे वेध लागतात. आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर ती आत्मिक शुद्धी, साधेपणा आणि त्याग शिकवणारी एक जीवनप्रवृत्ती आहे. पंढरपूरची वारी सर्व धर्म, जाती आणि वयोगटातील लोकांना एकत्र आणणारी, समाधान आणि शांती देणारी परंपरा आहे.

या ऐतिहासिक व पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना व नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी 'ai-Dindi' नावाची एक अभिनव संकल्पना साकार झाली आहे.

कशासाठी आहे 'ai-Dindi'?ai-Dindi ही पारंपरिक वारी आणि आधुनिक व्यवस्थापनाचा सुंदर संगम आहे. १८ वर्षांपूर्वी उदयास आलेली ही संकल्पना पूर्वी “आयटी दिंडी” या नावाने ओळखली जात होती. या उपक्रमात सामील होण्याची इच्छा असणाऱ्यांना 'मी गृहिणी आहे, निवृत्त आहे, आयटी क्षेत्रात नाही तरी सहभागी होता येईल का?', असे प्रश्न पडत होते. वारीत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांनी या उपक्रमाच्या व्याप्तीत वाढ करण्याची गरज अधोरेखित केली. एकीकडे 'आयटी दिंडी' सुरूच ठेवून आता 'ai-Dindi' म्हणजेच All Inclusive Dindi असा नवीन टप्पा सुरू करण्यात आला आहे. आळंदी ते पुणे ह्या टप्प्यात पूर्वीप्रमाणेच आयटी दिंडी ह्या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, पण वारीच्या पुणे ते पंढरपूर ह्या पुढील टप्प्यांसाठी 'एआय दिंडी' असणार आहे.

ai-Dindiचा अर्थ आणि दृष्टीकोन:'एआय दिंडी' म्हणजेच ऑल इनक्लुसिईव्ह दिंडी अर्थात कोणताही वय, व्यवसाय, भाषा किंवा पार्श्वभूमी असो, प्रत्येकाला सामावून घेणारी ही सेवा असणार आहे.

Artificial Intelligence: व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात केला जाणार आहे.

Adhyatmik Intelligence: नव्या पिढीत अध्यात्मिक जागृती निर्माण करणे हा या मगच उद्देश आहे.

'ai' म्हणजे मराठीत ‘आई’. माऊलीसारखी प्रेमळ, आधार देणारी ताकद. वारीत प्रत्येक जण एकमेकांना 'माऊली' म्हणतो. हाच आपलेपणाचा, एकतेचा आणि भक्तीचा संदेश आहे.

ai-Dindi काय करते?ai-Dindi ही नफा नसलेली संस्था असून, ती विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अथवा व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींद्वारा सेवाभावी वृत्तीने चालवली जाते. अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे, हा या वारीचा उद्देश आहे.

कोणालाही आपल्या सोयीच्या दिवशी वारीत सहभागी होता यावे, यासाठी विशेष बस व्यवस्था असते. म्हणजे ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला शनिवारी वेळ आहे आणि पालखी जेजुरी ते वाल्हे या टप्प्यात आहे, तर स्वारगेटहून जेजुरीसाठी बसची व्यवस्था असते. त्या टप्प्याची वारी केली की, संध्याकाळी परत पुण्यात आणून सोडलं जातं. वारीत सहभागी होण्यासाठी अभंग, टाळ-मृदंग, नामजप व भजन शिकवणारी प्रशिक्षण शिबिरे, भजन संध्या आणि वारीतील खेळ पुण्यात घेतले जातात. प्रत्येक टप्प्यासाठी नाममात्र सेवाशुल्क आकारले जाते. ज्यात बस सेवा, पाणी, नाश्ता, जेवण आणि एआय दिंडीची टोपी समाविष्ट असते. सलग काही दिवस वारी करायची असल्यास राहण्याचीही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. पूर्ण वारी (आळंदी ते पंढरपूर) करण्यासाठीदेखील आखणी व मार्गदर्शन केले जाते.

टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग आणि नामाच्या संगतीत वारीचा 'ai-Dindi' अनुभव घेण्यासाठी www.aidindi.org यावर नोंदणी करू शकता. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी