शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताची जबाबदारी ट्रॅव्हल्स कंपनीवरही; परिवहन विभागाने पाठविला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 08:45 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दिवसेंदिवस ट्रॅव्हल्सचे अपघात वाढले आहेत, परंतु अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल्स चालकावर कारवाई होते, पण ट्रॅव्हल्स कंपन्या अनेकदा नामानिराळे राहतात, पण आता त्या कंपन्याही वेसण घातली जाणार आहे. ट्रॅव्हल्स चालविताना कंपनी सर्व लाभ घेते, पण अपघात घडल्यास जबाबदारी नाकारली जाते. त्या कंपनीची जबाबदारी निश्चित करा, असा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला आहे.

राज्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. साडेतीन कोटींहून अधिक वाहने असून अपघात आणि अपघाती मृत्यूही वाढत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ३० हजार ८५७ रस्ते अपघातात १३,५७९ जणांचा मृत्यू झाला, तर १३,५७९ जखमी झाले होते.

अपघाताची प्रमुख कारणे

  • चालकाला थकवा असताना बस चालविणे 
  • बसमध्ये तांत्रिक बिघाड 
  • भरधाव वेगाने वाहन चालविणे
  • मद्यपान करून वाहन चालविणे
  • मोबाइलचा वापर करणे

बस अपघातात चालकासोबत संबंधित कंपनी लाभ घेते, पण अपघाताची जबाबदारी घेत नाही. या कंपनीची जबाबदारी निश्चित करा, असा प्रस्ताव परिवहन विभागाने तीन महिन्यांपूर्वी रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविला आहे. - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त.

बस अपघातात बस कंपनी जबाबदारी निश्चित करणे स्वागतार्ह्य निर्णय आहे. कित्येक वेळा बस चालकाला थकवा आला असताना, त्याला जास्त पैसे देऊन बस चालविण्यास भाग पाडले जाते. काही बस नादुरुस्त असताना चालविल्या जातात. त्यामुळे बस अपघात होऊन प्रवाशांचा जीव जातो.  - डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ज्ञ.

टॅग्स :Accidentअपघात