शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राज्यातील मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली, रात्री सव्वा आठपर्यंत सुरू राहणार कार्यालये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 19:20 IST

नव्या आर्थिक वर्षात शासनाचे बदलतात धोरण

कोल्हापूर : आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी दस्तसंख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे. १ ते ३१ मार्चपर्यंत वेळेत सवलत देण्यात आली असून राेज सकाळी पावणे दहा ते रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल. मात्र नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दस्त सादर करणे आवश्यक आहे.नव्या आर्थिक वर्षात शासनाचे धोरण बदलतात. दस्त नोंदणी, रेडिरेकनरचा दर कमी जास्त होतो. शिवाय वर्षअखेर असल्याने काही सोयी-सवलती दिल्या जातात. नवीन वर्षात दस्त नोंदणीचे नियम, निकष, दर बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांची ३१ मार्च पूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई असते.या काळात खूप जास्त संख्येने दस्त येत असल्याने सर्व्हरला अडचणी येऊन डाऊन होतो. त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया हळू होते. या तांत्रिक अडचणींमुळे दस्त नोंदणी थांबू नये ३१ मार्चपूर्वी सर्व नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने १ ते ३१ मार्च या कालावधीत राज्यातील सर्व मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली.

दिवसाला ५० हून अधिक दस्तवर्षातील ११ महिन्यात मुद्रांकच्या करवीरसारख्या कार्यालयात दिवसाला ३० ते ३५ दस्त नोंदणी होते. ग्रामीण भागात ही संख्या थोडी कमी असते. पण मार्च महिन्यात विशेषत: १५ मार्चनंतर ही संख्या थेट ५० वर जाते. दिवसाला सरासरी ४५ ते ५० दस्त नोंदणी होते. अशी स्थिती राज्यातील सर्वच मुद्रांक कार्यालयांमध्ये असल्याने सर्व्हरवर लोड येऊन यंत्रणा मंदावते.

८० टक्के उद्दिष्ट पूर्ण..जिल्हा मुद्रांक विभागाला यावर्षी ६५० काेटींचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारीअखेर ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के उद्दिष्ट मार्चमध्ये पूर्ण करण्याचे विभागाचे प्रयत्न आहेत.

  • सध्याची वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५.
  • १ ते ३१ मार्च दरम्यानची वेळ : सकाळी ९.४५ ते रात्री ८.१५
  • दस्त सादर करण्याची वेळ : सायंकाळी ६ वाजेपर्यंत

नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले दस्त कार्यालयात सादर करावेत व वेळेच्या सवलतीचा लाभ घ्यावा. - बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार