शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

तणाव वाढला! कर्नाटकाने ‘सीमा’ ओलांडली; महाराष्ट्रात संतापाची लाट आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 06:03 IST

कन्नडिगांची वाहनांवर दगडफेक; तणावामुळे बस वाहतूक थांबविली, सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे

मुंबई/बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली. महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे.

टाेलनाक्यावर बंदोबस्तकोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक व महाराष्ट्राचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. टोलनाक्याजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विजय देवणे यांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना रोखले.

एसटी प्रवासाला ब्रेकपोलिसांच्या विनंतीनुसार एसटी वाहतूक थांबविण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

..तर महाराष्ट्राचा संयम सुटेल : शरद पवारसीमाभागात जे घडते आहे त्यावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत, त्यांचे सहकारी असे हल्ले करीत असतील तर हा देशाच्या ऐक्याला मोठा धक्का आहे. केंद्राने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. कुणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी पूर्णतः केंद्र व कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल, असा इशाराही पवारांनी दिला.

...तर केंद्राकडे जावे लागेल : फडणवीसकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी मी चर्चा केली. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे व असे प्रकार घडू न देण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. त्यावर मी लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देणार आहे. कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या गाड्यांना स्वारगेटला फासले काळेस्वारगेट बसस्थानक परिसरातील सना ट्रॅव्हल्सच्या जवळ कर्नाटकातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना काळे फासण्यात आले, तर खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांची हवा सोडण्यात आली. 

..तर मला कर्नाटकात यावे लागेल : संभाजीराजेसौंदत्तीमधील भाविकांना कर्नाटक सरकारने संरक्षण द्यावे, अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे यांनी दिला. 

...तर तुमच्या ५० फोडूतुम्ही पाच गाड्या फोडल्या तर आम्ही तुमच्या ५० गाड्या फोडू, असा थेट इशारा देत कोल्हापुरात शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रस्त्यावर उतरले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक