शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:34 IST

Sanjay Raut on Money in Dhule Rest House: विश्रामगृहामध्ये १०२ नंबरच्या खोलीला टाळे ठोकून ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे तिथेच ठिय्या आंदोनलाला बसले होते. या खोलीत अंदाज समितीच्या आमदारांना देण्यासाठी ५ कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहातील १०२ नंबरच्या खोलीत १.८४ कोटी रुपयांची रोकड सापडल्यावरून ठाकरे गट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी जमा करण्याची जबाबदारी अंदाज समिती अध्यक्षांनी ठेकेदारावर दिली होती. पैसे जमा होत नव्हते म्हणून खोतकरांनी ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन अशी धमकी दिली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

विश्रामगृहामध्ये १०२ नंबरच्या खोलीला टाळे ठोकून ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे तिथेच ठिय्या आंदोनलाला बसले होते. या खोलीत अंदाज समितीच्या आमदारांना देण्यासाठी ५ कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. बुधवारी रात्री हा प्रकार घडला होता. प्रांताधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा करत या खोलीचे कुलूप तोडले आणि आतमध्ये त्यांना १.८४ कोटी रुपये सापडले आहेत. धुळे पोलीस गुन्हा दाखल करत आहेत. आता पैसे सापडल्याने राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरे गटाने हा मुद्दा उचलण्यास सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्रातला भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे, तर तो विधिमंडळापर्यंत गेलेला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या राज्यात या मंदिरापर्यंत भ्रष्टाचार पोहोचला. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष या घोटाळ्याचे मुकसमर्थक आहेत. कमिटीचे चेअरमन अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले ते किती भ्रष्ट आहेत ते पहा. गेल्या तीन दिवसांपासून पाच ते साडेपाच कोटींची कॅश धुळ्याच्या त्या विश्रामगृहात जमा होते. कमी दर्जाची कामे झालेली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांमध्ये इतर क्षेत्राच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झालेले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. 

या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी जमा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून ठेकेदाराने घेतली. त्यासाठी अध्यक्षांचे पीए 102 क्रमांकाच्या खोलीमध्ये पैसे जमा करत होते. 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याच ठरले होते. पुढल्या दोन दिवसात दहा कोटी जमा होणार होते. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करेन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी ठेकेदारांना दिली होती. त्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, असा आरोप राऊत यांनी केला.  अनिल गोटे यांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. हे पाहून कार्यालयातील लोक टाळे लावून पळून गेले. चार ते पाच तास ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. आमच्या दबावानंतर ही लोक आली असा आरोप राऊत यांनी केला. खोतकरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नावावर ही खोली होती. गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडी आणि सीबीआयला देणे गरजेचे आहे. तसेच अंदाज समितीच्या बैठका कशा आणि कुठे झाल्या याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही राऊत यांनी केली. 

तसेच मुलुंडचा पोपटलाल दुसऱ्या पक्षाच्या कोणी असे केले असते, तर टणाटणा उड्या मारत धुळ्यात गेला असता, आंदोलन केले असते, असा टोलाही राऊत यांनी किरिट सोमय्या यांना लगावला. हे मनी लॉन्ड्रींग आहे. एवढा पैसा आला कुठून? मी ईडीला पत्र लिहिणार आहे आणि हा पैसा कुठून आला आहे, याची चौकशी करायला सांगणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAnil Goteअनिल गोटेArjun Khotkarअर्जुन खोतकरShiv SenaशिवसेनाDhuleधुळे