शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

सूर्य आग ओकणार! मुंबईचा पारादेखील चढाच; तापमान ३४ अंशांवर, उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 06:22 IST

एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत.

मुंबई :

एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत. हवामान खात्याकडील माहितीनुसार, १० ते १२ एप्रिलदरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचा पारादेखील चढाच असून, कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. परिणामी वाढत्या उन्हासह उकाड्यातदेखील कमालीची वाढ झाली असून, नागरिक अक्षरश: होरपळून निघत आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. पुढील चार दिवसांसाठी राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, बिहार आणि झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढराज्यातील उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, ही संख्या ९२ झाली आहे. आतापर्यंत ८ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात २०२० - २०२१ या वर्षात उष्माघाताने ४३ जणांचा बळी  घेतला होता. त्यापूर्वी २०१६ साली १९, २०१७ साली १३ आणि २०१८ मध्ये  दोन मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, येत्या काळात राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटांचा इशारा असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघात म्हणजे वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. शरीरातील पाणी जसजसे कमी होते, तसतसे वेगवेगळे परिणाम यात दिसून येतात. त्यानुसार याचे काही उपप्रकार पडतात. पण, याला सरसकटपणे उष्माघात असेच म्हटले जाते. शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, परिणामी कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य तापमानही वाढते.  बाह्य उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

कुठे येईल लाट?९ ते १२ एप्रिल : झारखंड, बिहार१० ते १२ एप्रिल : विदर्भ

 ९ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान    कोरडे राहील. १० एप्रिलकोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.११ आणि १२ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMumbaiमुंबई