शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे नवे महिला धोरण; ८ मार्चला होणार घोषणा, संपत्तीमध्ये महिलांना समान वाटा, स्वतंत्र वृद्धाश्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:24 IST

Maharashtra Women's Policy: राज्य सरकारच्या नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिलादिनी ८ मार्चला करण्यात येणार आहे. नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. 

- यदु जोशीमुंबई : राज्य सरकारच्या नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिलादिनी ८ मार्चला करण्यात येणार आहे. नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. ८५ पानांच्या या महिला धोरणावर पुढील आठवड्यात जनसुनावणी घेतली जाईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिली. महिला धोरणातील कलमांची अंमलबजावणी किती दिवसात केली जाईल, अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या कोणत्या विभागाची असेल, या मुद्द्यांचा समावेश धोरणातच करण्यात येणार आहे. 

वारांगना, एलजीबीटीक्यू वर्गासही धोरणामध्ये स्थानमहिला धोरणात एलजीबीटीक्यू (तृतीयपंथी, समलैंगिक आदी) आणि वारांगना यांच्या कल्याणाचाही विचार करण्यात आला आहे. 

नव्या सर्वसमावेशक महिला धोरणाचा मसुदा आमच्या विभागाने तयार केला आहे. त्यावर पुढील आठवड्यापासून जनसुनावणी घेतली जाईल. - यशोमती ठाकूर,महिला व बालकल्याण मंत्री

असे आहे नवीन महिला धोरण- महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित असे रात्र निवारे उभारणार.- दुष्काळग्रस्त आणि दुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट संपविणार._ महापालिका,नगरपालिकांच्या- स्थायी समित्यांमध्ये महिलांना आरक्षण.- सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे महिला अनुकूल डिझाईन असेल.- सार्वजनिक वाहन तळांवर महिलांसाठी शौचालये, रॅम्प, रेलिंग, चेंजिंग रूम, एस्केलेटर, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, तसेच मदतीसाठी असेल पॅनिक बटणसेवा. ते दाबताच यंत्रणा धावून येईल.- राष्ट्रीय महामार्ग,राज्य महामार्ग आणिअन्य प्रमुख मार्गांवरदर २५ किलोमीटरवर महिला शौचालये उभारणार- ऑटो, टॅक्सी, जड वाहनांसाठीचे परवाने देताना महिलांना प्राधान्य.- महिलांना वारसहक्क मिळतो की नाही यावर सरकारची नजर.- फ्लॅट, घरांच्या खरेदीवेळी महिलांना सामायिक मालकीचा हक्क  देणार.- महिलांना जमिनी लीजवर देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. - महिलांच्या नावावर घर केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत.

टॅग्स :WomenमहिलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार