शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नामांतराचा अधिकार राज्य सरकारला नाही, एवढी वर्षे काय केले, राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 10:55 IST

हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा लागेल. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता असा निर्णय घेण्यामागचा हेतू कोणापासूनही लपू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. 

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. एवढी वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्हाला हे का सुचले नाही? आजचा दिवस यासाठी का निवडला? असे थेट सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहेत.ज्या ठिकाणी उच्च न्यायालय, विमानतळ, विभागीय कार्यालय, रेल्वे, मुख्य पोस्ट ऑफिस अशी महत्त्वाची कार्यालये असतात. अशा शहरांची नावे केंद्र सरकारच बदलू शकते. तो अधिकार राज्य सरकारांना नाही. आजपर्यंत जेवढी नावे बदलली गेली ती केंद्र सरकारकडून बदलली गेली. बॉम्बेचे मुंबई यावर शिक्कामोर्तब केंद्र सरकारने केले. मद्रासचे चेन्नई, अलाहाबादचे प्रयागराज ही नावे देखील केंद्र सरकारने बदलली. राज्य सरकारला आजच हा निर्णय का घ्यावा वाटला? मुळात आजचा हा निर्णय नसून हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा लागेल. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता असा निर्णय घेण्यामागचा हेतू कोणापासूनही लपू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. अडीच वर्ष महाराष्ट्रात सरकार असताना या सरकारला हा निर्णय या कालावधीत का घ्यावा वाटला नाही? तसा प्रस्ताव करून त्यांनी केंद्र सरकारला का पाठवला नाही? मुळात जे काम आपले नाहीच, ते काम आपण केले असे सांगण्यात काय हशील आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आजच्या निर्णयावर टीका केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे