शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरणाला मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 10:29 IST

दोन वेळा रद्द झालेला सोहळा १० एप्रिलला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य  संचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १० एप्रिल रोजी मुंबईत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यापूर्वी या पुरस्कारांच्या वितरणाची तारीख दोनदा जाहीर होऊन ती आयत्या वेळी रद्द केल्याने त्याचा मनस्ताप पुरस्कारप्राप्त कलावंतांना सहन करावा लागला होता.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२० व २०२१ अशा दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एप्रिल २०२२ मध्ये या पुरस्कारांची घोषणा  झाली  होती. 

२७ मार्च रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त

  • या पुरस्कारांचे वितरण सोमवार, २७ मार्च रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात होईल, असा निरोप पुरस्कारप्राप्त कलावंतांना देण्यात आला होता. त्यानुसार काही कलावंत मुंबईतही आले. मात्र, आदल्या दिवशी म्हणजे हा सोहळा रद्द झाल्याचा निरोप या कलावंतांना देण्यात आला.  
  • यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा सोहळा घेण्याचे ठरले होते. तेव्हाही कलावंतांना निरोप देण्यात आले. कलावंतांनी रेल्वेचे बुकिंगही केले. मात्र, ऐनवेळी हा सोहळा रद्द  केला. 
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिक