शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

'तो' साप संजय राऊतांच्या तोंडाला चावायला हवा होता- भरत गोगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:00 IST

राऊतांच्या पत्रकार परिषदेत साप आल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे 

Sanjay Raut Snake: संजय राऊत आणि सकाळची पत्रकार परिषद हे समीकरण ठरलेले आहे. रोजच्या प्रमाणे आजही संजय राऊत पत्रकार परिषदेत आले पण त्याच वेळी एक वेगळा प्रकार घडला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप निघाल्याने सर्वांचीच धावपळ झाली. राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी, सकाळच्या सुमारास ही साप निघाल्याची घटना घडली. साहजिकच ही बातमी नंतर भरपूर पसरली आणि त्यावर काही राजकीय लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या. यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले हे राऊतांबद्दल खोचक प्रतिक्रिया दिली.

"संजय राऊतांच्या तोंडाला साप चावायला हवा होता. तो त्यासाठीच निघाला असेल. ते खूप बोलतात त्यामुळेच असं व्हायला हवं होतं. संजय राऊत यांच्या घरामध्ये निघालेला साप त्यांच्या तोंडाला डसायला हवा होता. कारण अति तिथे माती हे ठरलेलं आहे. माणसाने किती बोलावं यासाठी प्रत्येकाला मर्यादा आहे. त्यांनी मर्यादा पाळली पाहिजे. कदाचित साप त्यांना इशारा द्यायलाच आला असेल", असे भरत गोगावले म्हणाले.  

दरम्यान, खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असतानाच अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच एक साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, पण साप निघाल्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली. त्यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला. सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या घनटेची पत्रकारांमध्ये आणि त्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना