शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव

By विलास गावंडे | Updated: October 11, 2023 11:06 IST

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली. 

यवतमाळ : प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो. राज्यातील ५७७ पैकी ३९४ बसस्थानकांचे चित्र अतिशय वाईट असल्याचे वास्तव पुढे आले आहे. 

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली. 

एका विभागाच्या सर्वेक्षण समितीने दुसऱ्या विभागातील बसस्थानकांची पाहणी करून मूल्यांकन केले. चांगला, मध्यम आणि वाईट असा शेरा या समित्यांनी आपल्या मूल्यांकनात दिला. 

दुसरी फेरी सुरू- आता सर्वेक्षणाची दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या फेरीत वाईट स्थितीत आढळलेल्या बसस्थानकांमध्ये काही बदल झालेला आढळतो काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. - पहिल्या फेरीत ज्या चमूने पाहणी केली, त्यांच्याकडे आता दुसऱ्या विभागाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. 

अशी आहे स्थिती -- ६९ ठिकाणची बसस्थानके चांगल्या स्थितीत आढळल्याचा शेरा समित्यांनी दिला आहे.- १२% ही एकूण संख्येच्या तुलनेत सुंदर बसस्थानकांची संख्या आहे. - ११४ बसस्थानकांना कामात सुधारणा करण्याची संधी आहे.  

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र