शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 07:59 IST

मुंबई: एकीकडे आझाद मैदानासह सीएसएमटी परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी, त्यामुळे झालेली कोंडी तर, दुसरीकडे मुंबापुरीच्या रस्त्यावर कोणी अंघोळ करतेय तर कोणाची जेवण बनविण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

Maharashtraमुंबई: एकीकडे आझाद मैदानासह सीएसएमटी परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी, त्यामुळे झालेली कोंडी तर, दुसरीकडे मुंबापुरीच्या रस्त्यावर कोणी अंघोळ करतेय तर कोणाची जेवण बनविण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून आले. दुभाजकावर सुकविण्यासाठी पसरलेल्या गाद्या अन् रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यात हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकाराने परिसर गजबजला होता. या गर्दीत काही जण थेट शिळ्या भाकरी, ठेचावर रस्त्यावरच ताव मारताना दिसले. आंदोलन सुरू असताना शुक्रवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने रात्रीही जोर धरला. आझाद मैदानात चिखलमय झालेल्या जागेतच काहींनी तग धरला. तर, काहींनी मिळेल तो आडोसा घेतला. 

आंदोलकांचा नाचत जल्लोष शनिवारीही आंदोलनास परवानगी मिळाल्याने परतीचा मार्ग धरलेल्यांनी परत आझाद मैदान परिसरात दाखल झाले. त्यांनी मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क केली. त्यातच दाटीवाटीने रात्र काढली. शनिवारीही पावसानेही हजेरी लावली, पण आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम होता. आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकारावर आंदोलक नाचत जल्लोष करताना दिसले.

एवढ्याशा त्रासाने मागे हटणार नाही...परभणीवरून आलेले लक्ष्मण देसाई सांगतात, परभणीवरून गुरुवारी सकाळी मुंबईत आलो. आधी स्टेशनवर रात्र काढली. त्यानंतर, रस्त्यावरच आडोसा घेत आधार घेतला. 

प्रशासनाने आम्हाला त्रास देण्यासाठी हॉटेल बंद केले. पाणी बंद केले. मात्र, एवढ्याशा त्रासाने काही होणार नाही. आम्ही मागे हटणार नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय जायचे नाही अशी खूणगाठ बांधली असल्याचे सांगितले. दुसरीकडे, पावसात रात्र काढली. आम्ही आणलेल्या डब्यातून शिल्लक राहिलेल्या भाकरी आणि ठेचावरही समाधानी आहोत. पण, आम्हाला आरक्षण हवेच. आता मरण आले तरी चालेल पण इथून हटणार नसल्याचे मराठा बांधवांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील