शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले, छगन भुजबळांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:49 IST

Chhagan Bhujbal : भाजपने डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे त्यात अडचण झाली असल्याचे छनग भुजबळ यांनी म्हटले.

भाजपाने आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले असल्याची टीका राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ केली आहे. आज सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशालाही धक्का दिला. मध्य प्रदेश सरकारला पुढील दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. भाजप शासित राज्यानेदेखील ही ट्रिपल टेस्ट केली नाही. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोर्टात जाऊन हा खेळ केला, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, आम्ही इम्पेरिकल डेटा मागत होतो. तो दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते. अॅड. तुषार मेहता हे सॉलिसिटर जनरल मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडत होते. भाजपने डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे त्यात अडचण झाली असल्याचे छनग भुजबळ यांनी म्हटले. 

याचबरोबर, ओबीसी आरक्षणाबाबतची जबाबदारी केंद्राची असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. भाजपच्या खेळामुळे देशाचे ओबीसी आरक्षण संकटात आले असून हे आरक्षण वाचवायचे असेल तर वकिलांशी चर्चा करावी आणि अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवणे आवश्यक आहे. भाजपचे लोक सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र विरोधात गेले. आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी आरक्षण खड्ड्यात गेली असून हे ओबीसी आरक्षण मिळत नाही ते केंद्र सरकारचे पाप असल्याचे छनग भुजबळ यांनी म्हटले. याशिवाय, आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना सांगतो दिल्लीत जाऊन बसा आणि मार्ग काढा असा टोलाही भुजबळ यांनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षण