शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 20:16 IST

आठवले म्हणाले, "मी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला 10-20 जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्याव्यात, अशीच आमची मागणी होती...

महायुतीच्या जागावाटपात आरपीआय नेते रामदास आठवले अद्यापही वेटिंगवरच असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात बोलताना आठवले यांनी एका बाजूला नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, तसेच धारावी किंवा चेंबूरच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलावे लागेल, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे सांगितले असल्याचे, म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवसच शिल्लक उरले आहेत. 

आठवले म्हणाले, "मी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला 10-20 जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्याव्यात, अशीच आमची मागणी होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांनाही रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे. असे असतानाही महायुतीच्या नेत्यांनी गांभीर्याने आमचा विचार केला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आमची यादी त्यांना दिली होती आणि कोणता तरी थोडासा त्याग करणे त्यांनी आवश्यक होते. आम्ही जर एवढा त्याग करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणआवर चांगल्या पद्धतीचे काम चालली आहे. म्हणून महायुतीसोबत राहायला हवे, अशी आमची भूमिका आहे. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीसोबत आहोत. असे असतानाही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते मुंबईत एबीपी माझासोबत बोलत होते.

मुंबईतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू -रिपब्लिकन पक्षाला एक जनाधार आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी माझ्यासोबत आहे. पण आता मी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर, त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर आणखी एक-दोन तरी जागा मिळाव्या, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला आहे. त्यात धारावी किंवा चेंबूरची जी जागा आहे, ती आम्हाला देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात, मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितेल.

फडणवीस यांच्याकडे आठवले यांच्या मागण्या... -याशिवाय, आम्ही फडणवीसांकडे मागणी केली आहे की, "दोन जागा विधानसभेच्या. एक एमएलसी, सरकार आल्यानंतर दोन-तीन महामंडळांची अध्यक्षपदे, तीन-चार उपाध्यक्षपदे, तसेच जिल्हा तालुक्यातील ज्या सरकारी समित्या आहेत त्यांत रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळायला हवे." याशिवाय, "आगामी महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्यांतही रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्यायला हव्यात." अशी मागणीही रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ramdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा