शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:51 IST

शिराळ्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा

शिराळा : शहरी नक्षलवादी व महाराष्ट्रावर बेगडी प्रेम असणारे पवार व ठाकरे कुटुंबीय यांना महाराष्ट्राची माती, सण, परंपरा, संस्कृती, महामानव यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. राज्याला खरा धोका त्यांच्यापासून आहे, अशी टीका माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.येथील एका मंगल कार्यालयात शेलार यांचा सत्कार तसेच भाजपा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे किंवा पवार यांच्या कुटुंबीयांनी कधी हिंदूंचे वटपौर्णिमा, हरितालिका, बैलपोळा, महाशिवरात्री आदी सण साजरे करताना आपण पाहिले आहेत का? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्तींमुळे नदीचे प्रदूषण होत असल्याने आलेली गणेश मूर्तीवरील बंदी हे पापही काँग्रेसचेच आहे. या लोकांना सण, परंपरा संस्कृतीशी काहीही देणेघेणे नाही.सत्यजीत देशमुख म्हणाले, शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर येथे कुंभमेळ्यानंतर येणाऱ्या झुंडीवेळी परिसराचा विकास महाराष्ट्र सरकारमार्फत होईल. शिराळा येथे खुले व बंदिस्त सभागृह व्हावे. या तालुक्यातील काही भागात मोबाइल रेंज नाही.सम्राट महाडिक म्हणाले, हा जिल्हा नाट्यपंढरी म्हणून ओळखला जातो. येथील कलाकारांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत नाही. येथील कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे.सदाभाऊ खोत म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पठ्ठे बापूराव अशी अनेक मोठी माणसे तालुक्यात होऊन गेली. मात्र, त्यांच्या नावे कोठे सभागृह नाही की स्मारक. वाळवा तालुक्यात एका व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव द्यायचे नाही, असे जणू ठरले आहे.यावेळी सी. बी. पाटील, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, के. डी. पाटील, बाळासाहेब पाटील, जयसिंगराव शिंदे, सुखदेव पाटील, रणजीतसिंह नाईक, सम्राट शिंदे, अनिता धस, संगीता साळुंखे, संभाजी नलवडे, विकास देशमुख, घनश्याम पाटील, जयराज पाटील, बाजीराव शेडगे उपस्थित होते.