शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची खरी कसोटी; राज्यासमोर विविध प्रश्न असले तरी मांडणारे विरोधक विखुरलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 09:01 IST

विधानसभा आणि विधानपरिषदेत एकीकडे विरोधी पक्षनेता नसताना दुसरीकडे आतापर्यंत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत एकी नसल्याचे चित्र समोर आले आहे.

मुंबई: राज्य विधानमंडळचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत विधानभवनात सुरू होत आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत एकीकडे विरोधी पक्षनेता नसताना दुसरीकडे आतापर्यंत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत एकी नसल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात विविध प्रश्न असले तरी ते आक्रमकपणे मांडण्याची विखुरलेल्या विरोधकांची कसोटी लागणार आहे, तर दुसरीकडे विरोधकांमध्ये एकी नसल्याने सत्ताधारी या अधिवेशनात निर्धास्त असणार आहेत.

अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. अभिभाषण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडला जाईल. अधिवेशनाचे खरे कामकाज मंगळवारपासून सुरू होईल.

विरोधकांमध्ये एकी नसल्याने सत्ताधारी निर्धास्त

सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे गेल्या काही अधिवेशनातही सत्ताधारी बाजूचे वर्चस्व राहिले आहे, पण विरोधकांनी काही प्रश्नांवर सरकारला यापूर्वी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावेळी विरोधकांमध्ये एकी नसल्याने प्रचंड संख्याबळ असलेल्या सत्ताधाऱ्यांना विरोधक कसे अडचणीत आणणार हा प्रश्न आहे.

तिजोरीवर ताण पाहता नवीन घोषणांकडे लक्ष

कापूस, सोयाबीन, धानाच्या भावाचा प्रश्न, अमेरिकेबरोबरच्या करारामुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम, शेतकरी कर्जमाफी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, राज्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, आदी मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.

यंदा अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्यावरील वाढते कर्ज, लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर पडलेला ताण आणि त्यामुळे इतर योजनांच्या खर्चाला लागलेली कात्री या पार्श्वभूमीवर फडणवीस काय नवीन घोषणा करतात याकडे लक्ष असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Budget Session: Divided opposition faces tough test amidst state issues.

Web Summary : Maharashtra's budget session begins amidst a divided opposition. Despite pressing issues like farmer distress and unemployment, a united front is lacking. The government, with a strong majority, appears confident. All eyes are on Deputy CM Fadnavis' budget and new announcements, considering the state's financial strain.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Budgetअर्थसंकल्प २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण