शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम! दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:34 IST

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 schedule: तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे. 

पुणे : नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर झाली आहे. ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्य संमेलन रंगणार आहे. अभिजात मराठी भाषेचा जागरही संमेलनात होईल.

तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे. 

शुक्रवारी (दि.२१) दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर उपस्थित राहतील. 

संमेलनस्थळी महात्मा जोतिराव फुले सभामंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप, यशवंतराव चव्हाण सभामंडप असतील. संमेलनाचा समारोप रविवारी (दि.२३) सायंकाळी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे होईल. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मराठी भाषामंत्री उदय सामंत, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहतील. 

संमेलनात शुक्रवारी होणारे कार्यक्रम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप

ग्रंथदिंडी प्रारंभ (सकाळी ९:३०)

उद्घाटन सत्र दुसरे (सायंकाळी ६:३०) - उपस्थिती - सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, ॲड. आशिष शेलार, पूर्वाध्यक्ष भाषण 

डॉ. रवींद्र शोभणे - अध्यक्षीय भाषण - डॉ. तारा भवाळकर.

निमंत्रितांचे कविसंमेलन - अध्यक्ष - इंद्रजित भालेराव (सायंकाळी ७:३०)

खुले अधिवेशन आणि समारोप

२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात खुले अधिवेशन होईल. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील सहभागी होतील. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.

मुलाखत - मराठी पाऊल पडते पुढे (सकाळी १०)परिसंवाद - विषय - मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार (दुपारी १२)विशेष सत्कार - संजीवनी खेर, दत्तात्रय पाष्टे, कमल पाष्टे - हस्ते - उषा तांबे (दुपारी २)लोकसाहित्य, भूपाळी ते भैरवी कार्यक्रम (दुपारी २:३०)परिसंवाद - विषय - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब (दुपारी ४), सहभाग : सुरेश भटेवरा, संजय आवटे, शैलेश पांडे, समीर जाधव, धीरज वाटेकर. मधुरव कार्यक्रम (सायंकाळी ६)

संमेलनात शनिवारी (दि. २२) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)

बहुभाषिक कविसंमेलन (दुपारी १२:३०) परिचर्चा - आनंदी गोपाळ (दुपारी २:३०) परिसंवाद - विषय - बृहन् महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन आणि साहित्य (सायंकाळी ४) 

संमेलनात २३ फेब्रुवारीला होणारे कार्यक्रम

असे घडलो आम्ही (सकाळी १०) परिसंवाद - विषय - सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य (दुपारी १२) परिसंवाद - विषय - नाते दिल्लीशी मराठीचे (दुपारी २:३०) संमेलनात रविवारी (दि. २३) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)परिसंवाद - विषय - अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत (सकाळी १०) परिसंवाद - विषय - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता (दुपारी १०) 

महात्मा जोतिराव फुले सभामंडपातही विविध कार्यक्रम रंगणार आहेत. शनिवारी (दि. २२) कवी कट्टा सकाळी ९ ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत आयोजित केला आहे. रविवारी (दि.२३) कवी कट्टा सकाळी ९:३० ते दुपारी १ आणि दुपारी १ ते २ या वेळेत होईल.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळdelhiदिल्ली