Shiv Sena Shinde Group And Congress Alliance: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मतदान झाल्यानंतर या सगळ्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले असा आरोप करून ठाकरेंपासून फारकत घेणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा काँग्रेसशी युती केल्याचे समोर आले आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली. या टीकेला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उमरगा नगरपरिषदेत शिंदेसेना, काँग्रेस, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ती सेना यांची युती झाली होती. या युतीत निवडणूक लढवली होती. शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेसचा झेंडाही फडकवला गेला. त्याशिवाय शिंदेसेनेचे आमदार गळ्यात काँग्रेसचे उपरणे घालून घरोघरी प्रचार करण्यात आला. शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या युतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, आता तोच कित्ता परत फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा हातमिळवणी
धारशिवच्या उमरगा नंतर सादर आहे शिंदे-काँग्रेस युतीचे नवे पर्व, 'द मुरुड फाईल्स'. शिंदेंची अंतुलेना साथ.. बाण-पंजा एक साथ.. यंदा 'बाळासाहेबांचे विचार' खुंटीऐवजी थेट समुद्रात का मग, एकनाथ शिंदे जी? असा सवाल अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत केला. याला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जशी परिस्थिती असेल, तशी युती केली जाते. स्थानिक जनता कुणासोबत जातील किंवा एकत्र येतील, हे आताच्या घडीला कुणी सांगू शकत नाही. हे चित्र या निवडणुकांमध्येही पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांनी एवढा नाकाला म्हाका लावू नये. आम्ही एकत्र येत असू, तर ते जनतेच्या हितासाठी आहे. स्वार्थासाठी नाही, असे गोगावले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उमरगा नगर परिषद निवडणुकीत शिंदेसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची युती झाली. या युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड हे आहेत. युतीच्या या उमेदवारांचे बॅनर आणि पत्रके यावर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो पाहायला मिळाला. सोशल मीडियात हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
Web Summary : Shinde Sena and Congress formed an alliance in Murud, following a similar coalition in Umarga. This has sparked criticism from Thackeray's group, while Shinde's faction defends the union as being in the public interest.
Web Summary : मुरुड में शिंदे सेना और कांग्रेस ने गठबंधन किया, उमरगा में भी ऐसा ही गठबंधन हुआ था। ठाकरे गुट ने इसकी आलोचना की है, जबकि शिंदे गुट ने इस गठबंधन को जनहित में बताया है।