शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:43 IST

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sanjay Shirsat: बेडरुम व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं? असं वादग्रस्त वक्तव्य केलं. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे  नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी  सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांच्या बेडरुमधील व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या बाजूला पैशांची बॅग दिसत होती. त्याआधी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता करण्यावरूनही संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना जबाबदारीने बोलण्याची ताकीद दिली होती. मात्र आता पुन्हा मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अकोल्याच्या निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी "आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?," असं विधान केलं.

मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक राहिला नाही - सुप्रिया सुळे

मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा असतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक नसल्याचे म्हटलं. "मुख्यमंत्री महोदयांनी निर्वाणीचा इशारा दिला तरी राज्याच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधाने थांबत नाहीत.  आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणतायत की -'सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय'. शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा असतो. सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातून तो सरकारी तिजोरीत जमा होतो. या देशातील प्रत्येक नागरीकाचा त्या पैशावर अधिकार आहे. कोणतेही शासन व राज्यकर्ते त्या पैशाचे मालक नाही तर पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिलेले विश्वस्त असतात. या विश्वस्तांनी हा पैसा जपून, काटकसरीने केवळ जनतेच्या हितासाठी वापरायचा असतो, यांचे भान मंत्रीमहोदयांना असायला हवे. पण आता त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री महोदय त्यांच्यावर कोणती कारवाई करतील? एकंदर मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक राहिला नाही असे म्हणावे लागेल," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाEknath Shindeएकनाथ शिंदे