शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'मातोश्री'ने दूत म्हणून सूरतला पाठवलेले आमदारही 'शिंदेसेने'त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 21:29 IST

विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी उघड झाली होते.

विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी उघड झाली. निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल झाले होते. तसंच सध्या एकनाथ शिंदे आणि अन्य आमदार गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. परंतु यापूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदार सूरतला असताना त्यांच्या मनधारणीसाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवण्यात आलं होतं. परंतु आता याला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

शिवसेनेकडून ‘शिंदेसेने’त सामील झालेल्या आमदारांची मनधारणी करण्यासाठी गेलेले रविंद्र फाटक हेच आता ‘शिंदेसेने’त सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका मानला जात आहे. रविंद्र फाटक हेदेखील गुवाहाटीला पोहोचले आहेत.

व्हिडीओ आला समोरबंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ माध्यमांमध्ये झळकला आहे. या व्हिडिओत बंडखोर आमदार एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता बनवत असल्याचं घोषित करत आहेत. त्यानंतर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे सुख-दुःख आहे, ते आपलं सगळ्यांचं एक आहे. काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे, अख्ख्या पाकिस्तान काय परिस्थिती होती माहितीय असं त्यांनी सांगितले. 

त्यानंतर नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचं सूतोवाच केले आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे