शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:10 IST

एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली.

इर्शाळवाडीमध्ये १७ ते १८ घरांवर डोंगर कोसळला, एवढी अडचणीची जागा होती की आपल्याकडे यंत्रणा असून देखील आपण ती वापरू शकत नव्हतो. कालच्या दिवसभरात २० लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर ११९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. 

एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीला गेल्याने काय काय मदत करता आल्याचे सांगितले. रात्री ११.३५ वाजता पहिली माहिती मिळाली. रात्री १२.४० सुमारास पहिली यंत्रणा पोहोचली होती. दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती यांमुळे परिस्थिती कठीण होती. NDRF ४ टीम, अन्य अनेक पथके, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली. गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत तत्काळ घटनास्थळी धावले. ३ वाजता गिरीश महाजन हे प्रत्यक्ष घटना घडली तिथे पोहोचले. अदिती तटकरे, अनिल पाटील हेही पोहोचले, असे शिंदे म्हणाले. 

मी आलो तर यंत्रणा वेगाने काम करेल, वाटेत मला अमित शहांचा फोन आला, त्यांनी केंद्र काय मदत करू शकते हे विचारले. तसेच लष्कराची दोन मोठी वजन उचलणारी हेलिक़ॉप्टर तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. याच हेलिकॉप्टरद्वारे आम्ही यंत्र सामुग्री पोहोचवू शकलो आहोत, असे शिंदे म्हणाले. 

६०-७० कंटेनर मागविण्यात आले आहेत. त्यापैकी ३० कंटेनर पोहोचले आहेत. यात तेथील ग्रामस्थांची राहण्याची सोय करण्यात येत आहे. तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जागा पाहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. सिडकोला या नागरिकांना वेगाने घरे बांधण्यास सांगितले आहे. सिडको या नागरिकांना घरे बांधून देणार आहे, असे शिंदे म्हणाले. 

घटनास्थळी खूपच विदारक स्थिती होती. वरून माती उरकण्यासाठी लोक काम करत होते. परंतू, ढिगारा पाहता आणखी मनुष्यबळ लागणार होते. आम्ही सिडकोशी संपर्क साधला, तिथून शिर्के, एल एँडटी सारख्या कंपन्यांचे सुमारे १००० मजूर फावडा, टिकाव आणि अन्य यंत्रणेसोबत पाठविण्यात आले आणि बचावकार्याला वेग आला, असे शिंदे म्हणाले. हे साहित्य नेणाऱ्यांना सॅल्यूट करायला हवे, असे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा