शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?

By यदू जोशी | Updated: October 22, 2024 07:16 IST

 २०१९ मध्ये अन्य २० मतदारसंघांमध्ये नोटा फॅक्टर महत्त्वाचा ठरला

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘नन अदर दॅन अबाऊ’ म्हणजे नोटा. अर्थातच कोणताही उमेदवार पसंत नसेल तर मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध असतो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ११ मतदारसंघ असे होते, की नोटावर जितकी मते पडली त्यापेक्षा विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे कमी होते.

२०१९ मध्ये विधानसभेचे २० मतदारसंघ असे होते की ज्यात विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा ६८ ते १,९३६ कमी मते ही नोटाला मिळाली होती. एक उदाहरण द्यायचे तर सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे ७६८ मतांनी विजयी झाले. तेथे नोटावर ७०० मते पडली. म्हणजे मताधिक्यापेक्षा केवळ ६८ कमी मते नोटाला मिळाली होती. मुक्ताईनगरमध्ये (जि. जळगाव) अपक्ष चंद्रकांत निंबा पाटील हे १,९५७ मतांनी विजयी झाले होते. तेथे नोटाला १,८०६ मते मिळाली होती.

नोटाची सुरुवात कधी झाली?

नोटाचा पर्याय मतदारांना द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर २०१३ पासून ईव्हीएमवर नोटाचा पर्याय द्यायला सुरुवात झाली ती राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपासून.

कोणत्या मतदारसंघातील मताधिक्य ‘नोटा’पेक्षा कमी?

मतदारसंघ    विजयी उमेदवार    मताधिक्य    पक्ष    नोटा मते१) उल्हासनगर    कुमार आयलानी    २,००४    भाजप    ४,९७८ २) चांदिवली    दिलीप लांडे    ४०९    शिवसेना    ३,३६० ३) अक्कलकुवा    के.सी. पाडवी    २,०९६    काँग्रेस    ४,८५७ ४) बोईसर    राजेश पाटील    २,७५२    बविआ    ४,६२२ ५) अर्जुनी मोरगाव    मनोहर चंद्रिकापुरे    ७१८    राष्ट्रवादी    १,३२७ ६) खडकवासला    भीमराव तापकीर    २,५९५    भाजप    ३,५६१ ७) कोपरगाव    आशुतोष काळे    ८२२    राष्ट्रवादी    १,६२२ ८) दौंड    राहुल कुल    ७४६    भाजप    ९१७ ९) डहाणू    विनोद निकोले    ४,७०७    माकप    ४,८२४ १०) भिवंडी पूर्व    रईस शेख    १,३१४    सपा    १,३५८ ११) अकोला पश्चिम    गोवर्धन शर्मा    २,५९३    भाजप    २,६१७ 

'या' आमदारांच्या विजयात नोटा ठरले निर्णायक

चेतन तुपे (हडपसर- राष्ट्रवादी) - मताधिक्य - २,८२०, नोटा - २,४७४ I किशोर आप्पा पाटील (पाचोरा-शिवसेना) - मताधिक्य - २,०८४, नोटा - १,७२४ I माणिकराव कोकाटे (सिन्नर-राष्ट्रवादी) मताधिक्य - २,०७२, नोटा - १,७०९ I मदन येरावार (यवतमाळ-भाजप) - मताधिक्य - २,२५३, नोटा - १,७८५. I अमित झनक (रिसोड- काँग्रेस) मताधिक्य - २,१४१, नोटा - १,५३४ I हरीश पिंपळे (मूर्तिजापूर-भाजप) मताधिक्य - १,९१०, नोटा - १,२२५ I राम सातपुते (माळशिरस- भाजप) मताधिक्य - २,५९०, नोटा - १,८९९ I डॉ. संदीप धुर्वे (आर्णी - भाजप) मताधिक्य - ३,१५३, नोटा - २४११ I सुभाष धोटे (राजुरा-काँग्रेस) मताधिक्य - २५०१, नोटा - १५६३ I राजू पाटील (कल्याण ग्रामीण - मनसे) मताधिक्य - ७,१५४ नोटा - ६,०९२ I संदीप क्षीरसागर (बीड-राष्ट्रवादी) - १,९८४, नोटा - ८७४ I जयकुमार गोरे (माण-भाजप), मताधिक्य - ३,०४३, नोटा- १,५२५ I राजेश टोपे (घनसावंगी-राष्ट्रवादी) मताधिक्य - ३,४०९, नोटा - १,८४२ I मोहन मते (दक्षिण नागपूर-भाजप) मताधिक्य - ४,०१३, नोटा - २,३५३ I राजेंद्र राऊत (बार्शी - अपक्ष) - मताधिक्य - ३,०७६ नोटा - १,२५५ I विकास कुंभारे - (मध्य नागपूर-भाजप) मताधिक्य - ४,००८, नोटा - २,१४९ I संजय पोतनीस (कलिना - शिवसेना) मताधिक्य - ४,९३१, नोटा - ३,०१२ I फारूख अन्वर शहा - (धुळे शहर - एमआयएम) मताधिक्य - ३,३०७, नोटा - १,३७१. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४EVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदान