शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:38 IST

ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं.

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील विधानामुळे राज्यात सध्या राहुल गांधींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधींच्या विधानावरून हा वाद निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थापोटी राहुल गांधींनी हे विधान केले असून ते बेजबाबदार आहेत. सावरकरांची बदनामी केल्यावर हिंदुत्ववादी गटाला बॅकफूटवर जावं लागेल असं त्यांना वाटलं असाव. परंतु या विधानामुळे हिंदुत्ववादी, सावरकर प्रेमी सगळ्या संघटना पेटून उठल्या आहेत. यातून सावरकर अभ्यासक तयार होणार असून या वादातून त्यांना स्फूर्ती मिळेल आणि आणखी अभ्यास करून सावरकर जगासमोर मांडतील याचा आनंद असल्याचं सावरकराचे नातू सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे. 

सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधींनी दाखवलेली पत्रे ही खरी आहेत परंतु त्याला माफीनामा म्हणणं अयोग्य आहे. ती निवेदनं आहेत. सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांना एका कोठडीत ठेवले होते. कुठल्याही सुविधा नव्हत्या. सामान्य बंदीवानाच्या सुविधा मला मिळाव्यात यासाठी त्यांनी अर्ज केले होते. माझ्यासोबत जितके क्रांतीकारी आहेत त्यांची सुटका करा असंही पत्रे लिहिले होते. सावरकरांना १९२९ साली महिना ६० रुपये निर्वाह भत्ता सुरू झाला. ती पेन्शन नव्हती. असे निर्वाह भत्ते काँग्रेस नेत्यांनाही मिळत होते. नुकतेच गांधीजींचेही समोर आले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो. गांधींचे वारसदार सतत गरळ ओकत आहे. सावरकरांच्या विचारधारेला विरोध करा पण बदनामी करू नका. राहुल गांधी, तुषार गांधी सातत्याने सावरकरांची बदनामी करतात. आम्ही कधीही गांधींजींची बदनामी केली नाही. राहुल गांधींचे विधान कुणालाही चीड आणणारी आहे. सावरकरांचे वैचारिक विरोधक तेदेखील या विधानाला पाठिंबा दिला नाही. विरोधक असो वा समर्थक कुणीही राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा देणार नाही असंही सात्यकी सावरकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, राजकीय लाभापोटी शिवसेना ठाकरे गट काँग्रेससोबत आहे. सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी कुठलीही मागणी कुटुंबियांनी केलेली नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यातच मला माझी संपत्ती मिळाली असं सावरकर म्हणाले होते. सावरकरांना विरोध असेल तर करा परंतु बदनामी करू नका अशी मागणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस