शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘समृद्धी’चा ७६ कि.मी.चा शेवटचा टप्पा खुला होणार; मुंबई-नागपूर प्रवास अधिक जलद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:14 IST

सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. महिनाभरात या वाहनांना मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे.

मुंबई - समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत.

आता समृद्धी महामार्गाचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे नाशिक मार्गावरील वडपेपर्यंतची कनेक्टरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होताच हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम बाकी होते. तसेच समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने येथून पुढे वडपे येथे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. या भागात असलेल्या गाेडाऊनची जागा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक होती. 

ही जागा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच सततच्या पावसामुळेही कामे लांबली होती. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर एमएसआरडीसीकडून ही कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो. त्यानंतर मुंबईपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे. 

गेल्या वर्षी सुरू झाला होता तिसरा टप्पा समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० कि.मी.चा मार्ग सुरू करण्यात आला होता. गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ किमीचा मार्ग सुरू केला होता. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. महिनाभरात या वाहनांना मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे.

आमने ते वडपे कनेक्टर असा असेलसमृद्धीवरून आमने येणाऱ्या वाहनांना नाशिक रस्त्याला वडपे येथे येऊन पुढे मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागेल. त्यासाठी प्रत्येकी चार लेनचा आणि ४.८ किमी लांबीचा रस्ता एमएसआरडीसीकडून उभारला जात आहे. हा रस्ता मुंबई - वडोदरा एक्स्प्रेसवेचा भाग आहे. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील एका ओव्हरपासच्या ॲप्रोचचे काम सध्या सुरू आहे.   

संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत येणारहा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबई-नागपूर हा प्रवास अधिक जलद होईल. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या महामार्गाचा संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग