शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही बसवण्यास विलंब झाला, उच्च न्यायालयाने कंत्राटदारांना झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 09:54 IST

पोलीस ठाणे सीसीटीव्ही प्रकरण, राज्य सरकारने या दोन्ही कंत्राटदारांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कंत्राट दिले होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास विलंब झाल्याने उच्च न्यायालयाने सीसीटीव्ही बसविण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांना सुनावले. हे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याची हमी देण्याचे निर्देशही दिले.

गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या जावी सिस्टिम्स इंडिया प्रा. लि. व पुण्याच्या सुजाता कॅम्प्युटर या कंत्राटदारांना राज्यातील पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसविण्यास विलंब का झाला ? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंत्राटदार न्यायालयात उपस्थित राहिले. राज्य सरकारने या दोन्ही कंत्राटदारांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कंत्राट दिले होते. करारानुसार, कंत्राट मिळाल्याच्या तारखेनंतर २२ आठवड्यांत राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदारांनी सरकारकडे आणखी १६ आठवड्यांची मुदत मागितली. 

कंत्राटदारांनी न्या. एस.जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाला सांगितले की, त्यांनी आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण केले आहे आणि उर्वरित काम येत्या ८ ते १० दिवसांत पूर्ण करण्यात येईल. कंत्राटदारांनी भूतकाळात चांगले काम केल्याने त्यांना ६५ कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याची माहिती महाअधिवक्ता कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी केलेल्या कामामुळे दिल्ली पोलिसांना आरोपी पकडण्यात मदत मिळाली. त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना कंत्राट दिले आहे, अशी माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. 

लेखी हमी देण्याचे निर्देशतुम्ही हे कंत्राट ‘ एलॲंडटी ’ला का दिले नाही? असा सवाल न्यायालयाने सरकारला केला. ‘हे खुल्या कोर्ट रुममध्ये सांगणे योग्य नाही. पण, ‘ एलअँडटी ’ ने आम्हाला सांगितले की, ते ‘ पानबिडी दुकानांचे कंत्राट घेत नाही’ ६५ कोटी रुपये हे त्यांच्यासाठी अत्यंत कमी रक्कम आहे,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. कंत्राट ६५ कोटींचे असू दे किंवा ६५० कोटी रुपयांचे पण हे काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे, असे म्हणत न्यायालयाने कंत्राटदारांना काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात १५ मार्चपर्यंत लेखी हमी देण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPolice Stationपोलीस ठाणे