शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला आता जानेवारीचा मुहूर्त, डिसेंबरअखेर काम होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 09:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्याची तयारी आहे.

- आशिष रॉय

नागपूर : समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू होण्यास आणखी विलंब होणार असून आता जानेवारीतच मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते शिर्डी हा द्रुतगती मार्ग डिसेंबरअखेर तयार होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्याची तयारी आहे. समृद्धी महामार्ग व नागपूर मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू-कामठी रोड या मार्गाचे लोकार्पण एकत्रित करण्यात येणार असल्यामुळे नागपूरकरांना आणखी काही दिवस मेट्रोच्या दोन फेऱ्यांपासून वंचित राहावे लागणार आहे. 

मेट्रोचा रीच ४ (सेंट्रल अव्हेन्यू) फेब्रुवारीपासून तयार आहे. तर रीच २ (कामठी रोड) देखील गेल्या काही आठवड्यांपासून पूर्ण झाला आहे. या मार्गावर शहर बसने किंवा खासगी वाहनांनी प्रवास करणारे शेकडो प्रवासी याच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

इतके झाले आहे कामसमृद्धी महामार्गाच्या सध्या ५२० किलोमीटरच्या फेज-१ पैकी ४९१ किलोमीटरचा नागपूर-शिर्डी रस्ता वाहतुकीसाठी सज्ज आहे. नागपूर ते सेलू बाजारदरम्यान २१० कि.मी. आणि मालेगाव ते शिर्डीदरम्यान २८१ कि.मी.चा रस्ता तयार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर केवळ पुलाचे काम सुरू आहे. नोव्हेंबरअखेर पुलाचा एक कॅरेज वे तयार होऊन तो दुतर्फा करण्यात येणार आहे. दुसरा डिसेंबरअखेर पूर्ण होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग