शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा ‘खेडकर’पणा! ३५९ संशयित सरकारी नोकरांची यादी सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 06:49 IST

दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवूनही सरकारी नोकरी मिळते; मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात. 

मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने  बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आल्यानंतर आता ‘एमपीएससी’सह तलाठी भरती, वनविभाग, आरोग्य विभाग, डीएड, शिक्षक अभियोग्यता अशा अनेक परीक्षांत खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा दावा ‘स्टुडंट्स राइट्स असोसिएशन’ने केला आहे. अशी खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केलेल्या तब्बल ३५९ संशयित सरकारी नोकरांची यादीच या संघटनेने दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना सादर केली आहे.दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवूनही सरकारीनोकरी मिळते; मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात. ‘स्टुडंट्स राइट्स असोसिएशन’ने १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ‘बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान’ राबविले होते. या अभियानातील संशयित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून बोगस असतील त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. शिवाय ज्या संबंधित अधिकाऱ्याने बोगस प्रमाणपत्र काढण्यास मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, असे नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील खऱ्या दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या हक्काचे आरक्षण यावर गदा येणार नाही, याची काळजी आयोगाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या निकालाअगोदरच मेडिकल तपासणी व प्रमाणपत्र तपासणी पूर्ण करावी. तसेच यादीची  चौकशी करून दोषींना शिक्षा करावी.     - महेश बडे, स्टुडंट्स राइट्स असोसिएशन 

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीEmployeeकर्मचारी