शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:29 IST

राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बोलावलेली बैठक अवैध असल्याचाही आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बोलावलेली बैठक अवैध आहे. अशी बैठक घेण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. उपसभापती गोऱ्हे यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली.

अशा बैठकीला सगळ्या पक्षांच्या महिला नेत्यांना न बोलविता ठरावीक लोकांनाच बोलावले. यामुळे त्यांचा स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याचा हेतू स्पष्ट होतो, असा टोलाही उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी लगावला. विधान भवनात उपसभापती कार्यालय व राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती व कार्यक्षमतेबाबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण ऐनवेळी देण्यात आले.

या संवाद कार्यक्रमाला वेळेत पोहोचूनही महाविकास आघाडीच्या इतर महिला नेत्यांना विधान भवनात प्रवेश नाकारण्यात आला. माझ्याशिवाय इतर कोणालाही यावेळी प्रवेश दिला नाही. अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारे नको म्हणून हा प्रकार झाला का? कुठे तरी पाणी मुरत आहे, अशी टीका खडसे यांनी केली. 

कामकाजातील त्रुटी दूर करू : गोऱ्हे

महिलांवरील अत्याचार प्रकरणांच्या अंमलबजावणीत आयोग हे प्रभावी साधन असले तरी त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी यंत्रणा बळकट कराव्या लागतील. लवकरच रिक्त पदे भरून कामकाजातील त्रुटी भरून काढल्या जातील. महिला धोरणामध्ये आयोगाने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठकीदरम्यान सांगितले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजप आमदार चित्रा वाघ, आ. प्रज्ञा सातव, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेRohini Khadseरोहिणी खडसेSushma Andhareसुषमा अंधारे